आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ओए ओए..\' गाण्यामुळे HIT झालेल्या या अॅक्ट्रेसला नव-याने दिला घटस्फोट, जगतेय अज्ञातवासात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम आणि तिचा नवरा राजीव राय कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. दोघे १५ वर्षांपूर्वीच वेगळे झाले होते. मात्र आता कायदेशीररित्या दोघांचे मार्ग विभक्त झाले आहेत. २५ वर्षांपूर्वी दोघांचे लग्न झआले होते. आखिरी अदालत आणि त्रिदेव या सिनेमांमध्ये झळकलेल्या सोनमने लग्नानंतर अभिनय सोडला होता. गेल्या २५ वर्षांपासून ती अज्ञातवासात जीवन व्यतित करत आहे.

सामंजस्याने झाला घटस्फोट...
सोनमचे पती राजीव राय हे निर्माते असून त्यांनी मोहरा आणि गुप्त या सिनेमांची निर्मिती केली होती. घटस्फोटाविषयी त्यांनी सांगितले, "आम्ही गेल्यावर्षी जून महिन्यात कायदेशीररित्या विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही दोघांनी सामंजस्याने गयावर्षी २१ जानेवारी रोजी घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. आमच्यात कुठलेही भांडण किंवा मतभेद नव्हते. विभक्त होण्यामागे असे काहीखास कारण नाहीये. आम्ही वैवाहिक आयुष्य मार्गावर आणण्याचा खूप प्रयत्न केला मात्र अपयशी ठरलो. यामध्ये चुक कुणाचीही नाहीये."

त्रिदेवच्या सेटवर जुळले होते सूत...
असे म्हटले जाते, की राजीव आणि सोनम १९८९ साली त्रिदेव या सिनेमाच्या शूटिंगच्या काळात जवळ आले होते. तीन वर्षांनी म्हणजे २१ जानेवारी १९९१ रोजी या जोडीने लग्न केले. करिअर पीकवर असताना सोनमने राजीवसोबत लग्न केले होते. आखिरी अदालत आणि अजुबा या सिनेमांमुळे ती हिट झाली होती.

लग्नानंतर ठोकला बॉलिवूडला रामराम...
राजीवसोबत लग्नानंतर सोनमने बॉलिवूडला अलविदा केले. लग्नानंतर राजीव अंडरवर्ल्डच्या टार्गेटवर आले होते. त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर त्यांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला होता. पहिले लॉस एंजिलिस आणि नंतर स्वित्झर्लंडमध्ये काही वर्षे ते राहिले. नंतर मुंबईत परतले. २००१ पासून दोघे वेगवेगळे राहतात.

मुलाच्या होकारानंतर घेतला घटस्फोट....
सोनमसोबतच्या नात्याविषयी राजीव म्हणाले, "गेल्या १५ वर्षांपासून आम्ही व्हेकेशनवर एकत्र जातो. मात्र वेगवेगळ्या रुममध्ये राहतो. मुलाच्या शिक्षणाच्या निमित्ताने आम्ही जगातील वेगवेगळ्या शहरांमध्ये राहिलो. आम्ही खूप आधी वेगळे होणार होतो. मात्र मुलगा १८ वर्षांचा होण्याची वाट पाहात होतो. आता तो २३ वर्षांचा झाला आहे आणि मॅच्युरिटिने आमचा निर्णय स्वीकारला आहे. जर तो आमच्या निर्णयाने आनंदी झाला नसता, तर आम्ही दोघे आपापाले आयुष्य वेगवेगळे जगू शकलो नसतो."

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, रजा मुराद यांची भाची आहे सोनम..
बातम्या आणखी आहेत...