आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहाविरोधात FIR दाखल करण्याचा आदेश, 18 व्या वर्षी शस्त्र परवाना तयार केल्याचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चौकशीत समोर आले की, 12 बोअरच्या या रायफलची पूर्वी सुल्तान नावाने नोंदणी केलेली होती. त्यानंतर ती सोहा अली खानच्या नावावर करण्यात आली. (फाइल) - Divya Marathi
चौकशीत समोर आले की, 12 बोअरच्या या रायफलची पूर्वी सुल्तान नावाने नोंदणी केलेली होती. त्यानंतर ती सोहा अली खानच्या नावावर करण्यात आली. (फाइल)
चंदिगड/गुरुग्राम - हरियाणाच्या लोकायुक्तांनी सोहा अली खानला देण्यात आलेल्या शस्त्र परवाना प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सोहाला 1996 मध्ये शस्त्र परवाना देण्यात आला होता, असा आरोप आहे. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी किमान वय 21 असणे गरजेचे असते पण हा परवाना मिळाला त्यावेळी सोहाचे वय केवळ 18 वर्ष 1 महिना होते असे समोर आले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 24 जुलैला होणार आहे. 

काळवीट शिकार प्रकरणी चौकशीदरम्यान समोर आले प्रकरण 
- हे प्रकरण सोहा अली खानच्या 12 बोअर रायफलच्या लायसन्सशी संबंधित आहे. नवाब मन्सूर अली खान पतौडी यांनी 2006 मध्ये याच रायफलद्वारे झज्जर मध्ये काळवीटाची शिकार केली होती, असे समोर आले आहे. त्यानंतर ही रायफल जप्त करण्यात आली होती. पण ही रायफल सोहाच्या नावावर नोदवलेली असल्याचा उल्लेख रिपोर्टमध्ये करण्यात आलेला नाही. हरियाणाच्या झज्जरमध्ये या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. 
- तपासात समोर आले होते की, 12 बोअरची ही रायफल आधी सुल्तान नावाने नोंदवलेली होती. नंतर ती सोहा अली खान नावाने नोंदवण्यात आली. 
- लोकायुक्तांनी या संपूर्ण प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधातही एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

4 नोव्हेंबर, 2008 मध्ये रिन्यू केले लायसन्स 
- नंतर पतौडी यांनी पोलिस ठाण्याच्या मार्फत लायसन्स 4 नोव्हेंबर 2008 पर्यंतसाठी रिन्यू केले. तपासात सांगण्यात आले की, झज्जर मध्ये दाखल करण्यात आलेल्या प्रकरणाची माहिती पतौडी यांनी दिली नव्हती. त्यामुळे परवाना जप्त करण्यात आला नाही. 
- त्यावेळी जिल्हाधिकारी असलेल्या राकेश गुप्ता यांनी सोहा यांनी सोहा यांचे लायसन्स रिन्यू करण्याच्या अर्जावर कारवाई करत  8 मे 2008 ला लायसन्स रद्द केले. मात्र तोपर्यंत सोहाच्या लायसन्सची मूळ फाइल गायब झाली होती. कलेक्टरने कमी वयात लायसन्स जारी करण्याचे आणि फाईल हरवल्याची चौकशी करण्याचेही आदेश दिले होते. 
- त्याचवेळी एडीसी राहिलेले अभयसिंह यादव यांनी प्रकरणाची चौकशी केली होती. विशेष म्हणजे यादव यांनी चौकशीत कोणालाही आरोपी ठरवले नव्हते. 

लोकायुक्तात कोणी केली तक्रार 
- लायसन्स जप्त झाल्यानंतर प्रकरण जवळपास संपल्यात जमा होते. पण नंतर पिपल फॉर अॅनिमलचे चेअरमन नरेश कादियान यांनी या प्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार केली. 
- 20 एप्रिलला सुनावणीदरम्यान लोकायुक्त जस्टीस एनके अग्रवाल यांनी गुरुग्रामचे पोलिस आयुक्त, कलेक्टर, झज्जरचे एसपी आणि जिल्हाधिकारी यांच्यासह 5 जणांना आपली बाजू मांडण्यासाठी आणि 24 जुलैपूर्वी अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...