आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानचा बॉडीगार्ड शेरावर गुन्हा दाखल, वेटरला मारहाण केल्याची तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेते सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी तो त्याचा बॉडीगार्ड शेरामुळे चर्चेत आहे. गेल्या 18 वर्षांपासून सलमानसोबत सावलीप्रमाणे वावरणारा त्याचा बॉडीगार्ड शेरावर गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील डीएन नगर पोलिसांत त्याच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शेराने अंधेरीतील गुलमोहर रोडवरील हुक्का पार्लरमध्ये वेटरला मारहाण केली. त्याप्रकरणीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेरा गेल्या अठरा वर्षांपासून सलमानसाठी अंगरक्षकाचे काम करत आहे. सलमानच्या सावलीप्रमाणे तो त्याच्यासोबतच वावरत असतो. सलमानही शेराला आपल्या घरातील सदस्याप्रमाणेच मानतो. सलमान शेराचा मुलगा टायगरला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार असल्याची सध्या चर्चा आहे. शेराची स्वत:ची ‘टायगर सिक्युरिटी’ नावाची कंपनी असून, तो सेलिब्रिटींना सुरक्षा पुरवतो. तुर्तास शेरावर दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे सलमान चर्चेत आहे.
बातम्या आणखी आहेत...