आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 फ्लॉप सिनेमानंतर अजय देवगणच्या \'बादशाहो\'ला Box Office वर मिळाली चांगली ओपनिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता अजय देवगण आणि इलियाना डिक्रूज स्टारर 'बादशाहो' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 12.03 कोटींचा बिझनेस केला आहे. तर चांगले रिव्ह्यूज मिळूनदेखील आयुष्मान-भूमीच्या 'शुभमंगल सावधान' हा चित्रपट पहिल्या दिवशी फक्त 2.71 कोटींचा गल्ला जमवू शकला आहे. 
 
शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झालेल्या मल्टिस्टारर 'बादशाहोने' अजय देवगणला सेलिब्रेशनची संधी मिळवून दिली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या अजय देवगण आणि दिग्दर्शक मिलन लुथरिया यांच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 12 कोटींहून अधिकचा बिझनेस केल्याचे ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट केले आहे.  ‘कच्चे धागे’, ‘चोरी-चोरी’ आणि ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ नंतर मीलनचा अजय देवगणबरोबरचा हा चौथा चित्रपट आहे.
 
'बादशाहोचे' कलेक्शन अजयच्या मागील दोन चित्रपटांच्या तुलनेत अधिक राहिले आहे. अजयच्या 'शिवाय' आणि 'अॅक्शन जॅक्सन' या चित्रपटाने त्याची निराशा केली होती. 'शिवाय'ने पहिल्या दिवशी 9.19 कोटी तर 'अॅक्शन जॅक्सन'ने 10.37 कोटींचा व्यवसाय केला होता. हे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नव्हते. त्यामुळे दीर्घ काळापासून अजय एका हिट चित्रपटाच्या प्रतीक्षेत होता. बादशाहोचा पहिल्या दिवसाचा कमाईचा आकडा बघता, हा चित्रपट अजयच्या करिअरमधील हिट चित्रपटांच्या यादीत सामील होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.  

पुढे वाचा, 'बादशाहो'ने मारली बाजी... 
बातम्या आणखी आहेत...