आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'सुल्तान\'ने पहिल्या दिवशी कमावले 36.5 कोटी, स्वत:चा रेकॉर्डही मोडू शकला नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: सुपरस्टार सलमान खानच्या 'सुल्तान' सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 36.5 कोटींची कमाई केली आहे. त्याने स्वत:च्या 'प्रेम रतन धन पायो'चासुध्दा रेकॉर्ड मोडित काढला नाहीये. 'प्रेम रतन धन पायो' सलमानच्या करिअरमधील बिगेस्ट ओपनर सिनेमा आहे. अद्याप या यादीत शाहरुख खान स्टारर 'फॅन' (19 कोटी) पहिल्या स्थानावर आहे. सिनेमा व्यवसाय तज्ञांच्या मते, 'सुल्तान' विकेंडमध्ये 150 कोटींची कमाई करू शकतो.
शाहरुखचा हा रेकॉर्ड मोडित काढू शकला नाही सलमान...
जर बॉलिवूडच्या इतिहासाविषयी सांगायचे झाले तर आतापर्यंत रिलीज झालेले सर्व सिनेमांनी पहिल्या दिवशीच्या कमाईच्या बाबतीत सलमान शाहरुखपेक्षा एक पाऊल मागे आहे. 2014ला रिलीज झालेला शाहरुख स्टारर 'हॅपी न्यू ईअर' 45 कोटींच्या कमाईसह टॉप-10च्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या 'सुल्तान' सिनेमात सलमान खानने हरियाणाच्या एका पहिलवानाची भूमिका साकारली आहे. वितरक अक्षय राठी म्हणाले, की सिनेमा देशभरात चांगला बिझनेस करत आहे. कमाईच्या बाबतीत जोरदार सुरुवात झाली आहे. प्रत्येकजण सिनेमाला पसंत करत आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनीसुध्दा सिनेमाने पहिल्या दिवशी
40 कोटी कमावल्याचे सांगितले आहे.
सिनेमा वितरक राजेश थडानी यांचे म्हणणे आहे, की सिनेमाने अपेक्षेनुसार सुरुवात केली आहे. या आठवड्यात सिनेमाची कमाई जवळपास 150 कोटी होऊ शकते. राठी आणि थडानी यांच्या सांगण्यानुसार, ऑनलाइन लीक होऊनदेखील सिनेमाच्या कमाईवर काहीच परिणाम झालेला नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कोणत्या सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमाई केली...
बातम्या आणखी आहेत...