आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIRST LOOK: CANNES 2015 मध्ये या अंदाजात दिसली कतरिना कैफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे - रेड कार्पेटवर Oscar De La Rentaच्या आउटफिट आणि उजवीकडे मीडियाशी संवाद साधत असताना Milly Spring 2015च्या ड्रेसमध्ये कतरिना कैफ)
फ्रान्सः 68 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये डेब्यू अपिअरन्स देणा-या कतरिना कैफचा फस्ट लूक समोर आला आहे. पहिल्या छायाचित्रात कतरिना लॉरिएल या ब्युटी ब्रॅण्डच्या अॅम्बेसडरच्या रुपात कानच्या रेड कार्पेटवर अवतरलेली दिसत आहे. यावेळी तिने Oscar De La Renta चे डिझाइनर आउटफिट परिधान केले होते.
तर कतरिनाचे दुसरे छायाचित्र मीडियाशी संवाद साधत असताना क्लिक करण्यात आलेले आहे. कॅटने Milly Spring 2015च्या कलेक्शनमधील ब्लॅक अँड व्हाइट कलरचा गाउन परिधान केला होता.
कतरिना व्यतिरिक्त 68 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडमधील काही अभिनेत्री सहभागी होणार आहेत. या इव्हेंटमध्ये कतरिनानंतर आता ऐश्वर्या राय बच्चन आणि सोनम कपूर आपला जलवा दाखवणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा कानमध्ये पोहोचलेल्या कतरिनाची खास झलक...