आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोल्ड चित्रपटात दिसणार अक्षय-मौनीचा बंगाली Look! फोटोमुळे चर्चा सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - टीव्हीवरील नागीणच्या भूमिकेने प्रसिद्ध झालेली मौनी राय लवकरच रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे खिलाडी अक्षय कुमारबरोबर मौनी राय मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याने तिच्या चित्रपटाबाबत अधिक चर्चा सुरू आहे. गोल्ड या आगामी सिनेमात ही जोडी दिसणार आहे. या सिनेमाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात अक्षय आणि मौनीचा बंगाली लूक दिसत आहे. 

काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारने गोल्ड चित्रपटाचे शूट सुरू केल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यात आता हे फोटो समोर आल्याने लवकरच अक्षय आणि मौनीची जोडी पडद्यावर पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. टीम अक्षय नावाच्या एका ट्विटर अकाऊंटद्वारे दोन फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. हे सेटवरील शूटदरम्यानचे फोटो असल्याचे दिसत आहे. या दोन्ही फोटो मध्ये अक्षय कुमारचा लूक बंगाली असल्याचे दिसत आहे. तर एका फोटो मौनी रॉयही झळकली असून तिचा साडीतील लूकही बंगालीच आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा PHOTOS  
बातम्या आणखी आहेत...