आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्तची कार्बन कॉपी बनला रणबीर कपूर, On-location झाला SPOT

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः  रणबीर कपूर त्याच्या सिनेमांविषयी किती डेडीकेट आहे, या अंदाज त्याचा फस्ट लूक बघून बांधता येईल. अलीकडेच रणबीर संजय दत्तच्या बायोपिकच्या सेटवर दिसला. यावेळी तो अगदी हुबेहुब संजय दत्तच्या तारुण्यातील रुपात दिसला. या भूमिकेसाठी रणबीरने केवळ त्याचे केसच वाढवले नाहीत तर त्याची पर्सनॅलिटीसुद्धा अगदी संजय दत्तसारखीच दिसली. रणबीरचा हा फस्ट लूक बघता, बायोपिकविषयीची उत्सुकता नक्कीच शिगेला पोहचणारी आहे. 

शूटिंग सेटवरचे फोटो आले समोर...  
या भूमिकेसाठी रणबीरने भरपूर मेहनत घेतली आहे. मेहनतीनंतर त्याची चेहरापट्टी आणि त्याची शारीरिक हालचाल संजूबाबासारखी झाल्याचं दिसतंय. त्याने सिनेमासाठी 14 किलो वजन वाढवलंय. संजय दत्तचे सिनेमे तो बघतोय. त्याच्या वेगवेगळे 250 व्हिडीओ त्यांनी आत्तापर्यंत पाहिलेत. सध्या या सिनेमाचे शूटिंग मुंबईत सुरु आहे.  

250 तासांहून अधिक काळ पाहिले संजय दत्तचे फुटेज   
- संजय दत्तसारखी बॉडी बनवण्यासाठी रणबीर  राणा दग्गुबतीचा फिटनेस ट्रेनर कुणाल गिरकडून ट्रेनिंग घेतोय. 
- शिवाय त्याने संजय दत्तचे जुने फुटेज पाहिले. सुमारे अडीचशे तासांहून अधिक काळ त्याने हे फुटेज पाहिले.   

राजकुमार हिराणी बनवत आहे सिनेमा 
- संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा राजकुमार हिराणी दिग्दर्शित करत आहेत.  
- सिनेमाचे निर्माते विधु विनोद चोप्रा आहेत. 
- रिपोर्ट्सनुसार, सिनेमात संजय दत्तची पत्नी मान्यताची भूमिका दीया मिर्झा साकारणार आहे. - संजयची आई नर्गिस दत्तची भूमिका मनीषा कोइराला साकारणार आहे.   
- सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अद्याप रिलीज डेट निश्चित झालेली नाही.  

पुढील स्लाईड्समध्ये बघा, Photos... 
बातम्या आणखी आहेत...