आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बॉम्बे वेल्वेट'मधील रवीना टंडनचा First look आला समोर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुराग कश्यप यांच्या आगामी 'बॉम्बे वेल्वेट' या सिनेमातील रवीना टंडनची पहिली झलक उघड करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या सिनेमातील रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि करण जोहर यांचा लूक रिलीज करण्यात आला होता.
या सिनेमात रवीनाची खूप खास भूमिका आहे. मध्यंतरी बातमी होती, की स्क्रिप्टमध्ये ऐनवेळी करण्यात आलेल्या फेरफारनंतर रवीनाने या सिनेमातून काढता पाय घेतला होता. मात्र आता रवीनाचे समोर आलेले हे छायाचित्र बघता ती बातमी अफवा असल्याचे सिद्ध होते.
फस्ट लूकमध्ये रवीना अनुष्काप्रमाणेच जॅज परफॉर्मन्स देताना दिसतेय. तिचा हा लूक स्वप्नील शिंदे यांनी डिझाइन केला आहे. यापूर्वी स्वप्नीलने 'बँग बँग'मधील कतरिनाचा लूक डिझाइन केला होता.