आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाजीराव मस्तानी\'मध्ये असा आहे रणवीर-दीपिका-प्रियांकाचा FIRST LOOK

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बाजीराव मस्तानी' या आगामी सिनेमातील रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्राचा लूक.)
मुंबईः 2015चा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'बाजीराव मस्तानी' या सिनेमाचे पहिले टीजर पोस्टर रिलीज झाले आहे. रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा स्टारर या सिनेमाचा टीजर 16 जुलै रोजी रिलीज होणारेय. टीजर पोस्टरमध्ये सिनेमातील स्टार्सचा लूक समोर आला आहे. बाजीराव मस्तानीचे निर्माते इरोज नाऊने सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर तिन्ही लीड अॅक्टर्सचा लूक रिलीज केला आहे.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या सिनेमात रणवीर सिंहने मराठी योद्धा बाजीरावची भूमिका वठवली आहे. दीपिका पदुकोण बाजीरावांची दुसरी पत्नी मस्तानीच्या भूमिकेत आहे. तर प्रियांका चोप्राने त्यांची पहिली पत्नी काशीबाईची भूमिका वठवली आहे. इरोज इंटरनॅशनल आणि संजय लीला भन्साळींच्या प्रॉडक्शनमध्ये तयार होत असलेला हा सिनेमा यावर्षी 18 डिसेंबरला रिलीज होणार आहे. याच दिवशी सुपरस्टार शाहरुख खानचा 'दिलवाले' हा सिनेमासुद्धा रिलीज होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये 'बाजीराव मस्तानी'ची खास छायाचित्रे...