(अभिनेते ऋषी कपूर)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर
आपल्या आगामी 'सनम रे' या सिनेमात 80 वर्षीय वृद्धाची भूमिका साकारताना दिसणार आहे. याची माहिती स्वतः ऋषी यांनी सोशल नेटवर्किंग साइट
ट्विटरच्या माध्यमातून दिली. त्यांनी सिनेमातील आपल्या फस्ट लूकचे एक फोटो शेअर केले आहे. या फोटोत ऋषी कपूर यांना ओळखणे कठीण आहे.
हा फोटो शेअर करुन त्यांनी ट्विट केले, "This picture is from "Sanam Re" play an eighty year old man. Cool!"
62 वर्षीय ऋषी कपूर यांचा हा नवीन लूक त्यांच्या मागील सिनेमांपेक्षा अगदीच हटके आहे. त्यांनी मोठ्या लेन्सचा चष्मा लावला आहे आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी कोट आणि ग्लव्ज घातले आहेत.
'सनम रे' हा म्युझिकल लव्ह स्टोरी असलेला सिनेमा आहे. यारियां फेम दिग्दर्शिक दिव्या खोसला कुमार हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. पुलकित सम्राट आणि यामी गौतम सिनेमात मेन लीडमध्ये आहेत.
पुढील स्लाईडसमध्ये पाहा 'सनम रे' मधील ऋषी कपूर यांच्या लूकची आणखी एक झलक...