आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Look : Saif Ali Khan And Katrina Kaif In Phantom

'फँटम'मधील सैफ अली खान आणि कतरिना कैफचे First Look आले समोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सैफ अली खानचा 'फँटम'मधील फस्ट लूक - Divya Marathi
अभिनेता सैफ अली खानचा 'फँटम'मधील फस्ट लूक

मुंबईः दिग्दर्शक कबीर खान यांच्या आगामी 'फँटम' या सिेमातील सैफ अली खान आणि कतरिना कैफ यांचा फस्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. यूटीव्ही मोशन पिक्चर्सने दोन्ही पोस्टर्स ट्विटरवर पोस्ट केले आहेत. सोबतच ट्विट केले, "A story you wish were true. Coming 28th Aug to a cinema near you. #PhantomTrailer25July @Nadiadwala_Ent @kabirkhankk".
पोस्टर्समध्ये सैफ आणि कतरिनाच्या डोळ्यांवर तिरंग्याची पट्टी बांधण्यात आली असून त्यामध्ये 26/11 मुंबई हल्ल्यातील दृश्य दिसतंय. सिनेमाचा ट्रेलर येत्या 25 जुलै रोजी रिलीज करण्यात येणार असल्याचे यूटीव्ही मोशन पिक्चर्सने आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे. हा सिनेमा 28 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणारेय.
पहिल्यांदाच कबीर खान आणि सैफ अली खान एकत्र काम करत आहेत. कतरिनाने यापूर्वी त्यांच्यासोबत 'एक था टायगर' आणि 'न्यूयॉर्क' या सिनेमांमध्ये काम केले आहे.
पुढील स्लाईडसमध्ये पाहा, सिनेमातील कतरिना कैफचा फस्ट लूकची झलक...