आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार अपघातात जखमी झालेल्या अभिनेत्री हेमामालिनी यांच्यावर झाली शस्त्रक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - भाजप खासदार हेमा मालिनी गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात जखमी झाल्या आहेत. हेमा मालिनी यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमा असून त्यांना चार टाके पडल्याची माहिती मिळाली आहे. हेमामालिनी यांच्यावर जयपूरच्या रुग्णालयात उपचार सुरु असून रुग्णालयातील त्यांचे एक छायाचित्र समोर आले आहे. छायाचित्रात त्यांच्या गालावर आणि माथ्यावर बँडेड लागलेले दिसत आहे. अपघातानंतर त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आले.
ड्रायव्हरला झाली अटक
जयपूरजवळ दौसा येथे झालेल्या या अपघातात एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. तसेच चार जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी हेमा मालिनी यांच्या कार चालकाला ओव्हस्पीड ड्रायव्हींगच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. हेमा मालिनी त्यांच्या मर्सिडीझ कारमध्ये मेहंदीपूर बालाजीचे दर्शन घेऊन मथुरेला जात होत्या. त्यावेळी जयपूर-आग्रा हायवेवर दौसा येथे समोरून येणाऱ्या अल्टो कारबरोबर त्यांच्या गाडीची जोरदार धडक झाली. त्यात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पुढे पाहा, रुग्णालयात दाखल हेमामालिनी यांची भेट घेतानाचे वसुंधरा राजे यांचे छायाचित्र...
फोटो सौजन्यः खबरइंडियाटीव्ही.कॉम