आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 वर्षांत प्रथमच सलमानच्या घरी होणार नाही गणपती बाप्पाचे आगमन, हे आहे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणपती उत्सवादरम्यान सलमान खान. (फाइल) - Divya Marathi
गणपती उत्सवादरम्यान सलमान खान. (फाइल)
मुंबई - सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून वांद्र्यातील 'गॅलेक्सी अपार्टमेंट' मधील घरात गणपतीची स्थापना करतो. पण यावर्षी सलमानच्या घरी बाप्पाचे आगमन होणार नाही. यावर्षी सलमान गॅलेक्सी अपार्टमेंटऐवजी त्याची बहीण अर्पिताच्या घरी बाप्पाची स्थापना करणार नाही. गेल्या 15 वर्षात असे प्रथमच घडत असल्याचे म्हटले जात आहे. 
 
यामुळे अर्पिताच्या घरी होणार बाप्पाची स्थापना.. 
- सलमान सध्या अबुधाबीमध्ये 'टायगर जिंदा है' च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी गणपतीची स्थापना बहीणीच्या घरी करण्याचा निर्णय घेतला आहे. 
- गेल्यावर्षीही सलमान खान 'ट्युबलाइट' च्या शुटिंगमुळे गणेश उत्सवात सहभागी होऊ शकला नव्हता. त्यामुळे यावेळी कुटुंबीयांनी अर्पिताच्या घरी स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. 

अशी सुरू झाली बाप्पाची स्थापना.. 
सलमानने सांगितले होते की, बहीण अर्पितामुळेच अनेक वर्षांपासून आमच्या घरात गणेश स्थापना होत आहे. आपल्या घरात गणपती आणायची हे तीच पहिल्यांदा म्हटली होती. त्यादिवसानंतर दरवर्षी आमच्याकडे गणेश स्थापना होऊ लागली. माझी गणपतीवर श्रद्धा आहे. गेल्या अनेक वर्षात माझ्यावर अनेक संकटे आली, पण बाप्पाने मला त्यातून सोडवले. 

शुटिंगहून परतणार सलमान.. 
रिपोर्ट्सनुसार सलमान खान 25 ऑगस्टला अबु धाबीहून 'टायगर जिंदा है' च्या शुटिंगमधून ब्रेक घेऊन एका दिवसासाठी भारतात परतणार आहे. त्यानंतर संपूर्ण कुटुंब अर्पिताच्या घरी गणेशोत्सवात सहभागी होईल. 

पुढील स्लाइड्सवर पाहा. सलमानच्या घरच्या गणपती उत्सवाचे काही PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...