आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्स ऑफिसवर \'नीरजा\'ला उत्कृष्ट प्रतिसाद, तीन दिवसांत निघाला निर्मिती खर्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. शुक्रवारी (19 फेब्रुवारी) रिलीज झालेल्या \'नीरजा\' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळवला आहे. पहिल्या आठवड्यात भारतात 22 कोटींची कमाई करून सिनेमाने बजेट काढले आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी कलेक्शनविषयी माहिती टि्वटरवर देऊन सांगितले, \'#Neerja goes from strength to strength. Fri 4.70 cr, Sat 7.60 cr, Sun 9.71 cr. Total: ₹ 22.01 cr. India biz. FAB! #ContentIsKing\'
 
21 कोटींमध्ये बनला सिनेमा...
सिनेमाने तीन दिवसांत बजेटची रक्कम वसूल केली आहे. निर्माता अतुल कास्बेकरने एका मुलाखतीत सांगितले होते, मार्केंटिंग आणि डिस्ट्रिब्यूशन सर्वकाही मिळून सिनेमाचे बजेट 21 कोटी आहे. 
 
वीकेंड कलेक्शनमध्ये आतापर्यंतचा तिसरा हाईएस्ट ग्रॉसर...
\'नीरजा\' केवळ बजेटमध्येच नव्हे तर पहिल्या आठवड्यात कमाईच्या बाबतीत आतापर्यंतचा तिसरा हाईएस्ट ग्रॉसर सिनेमा ठरला आहे. या यादीत 44 कोटींच्या कलेक्शन सोबत अक्षय कुमार आणि निमरत कौर स्टारर \'एअरलिफ्ट\' टॉपवर आहे. दुस-या नंबरवर सनी देओल स्टारर \'घायल वन्स अगेन\' आहे, या सिनेमा 23 कोटी कमावले आहेत.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या टॉप 10 लिस्टमध्ये कुठे आहे कतरिनाचा \'फितूर\'....