कटप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाचे उत्तर दिग्दर्शक एस. एस. राजामौलीच्या 'बाहुबली: बिगनिंग' सिनेमाच्या रिलीजनंतर चर्चेत आला. मात्र सिनेमाशी निगडीत अनेक असे प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे मिळण्यासाठी सिनेमाच्या दुस-या भागाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. divyamarathi.comने पहिल्या पार्टमधून असे निवडक प्रश्न काढले आहेत, जे दुस-या पार्टमध्ये मिळणे अपेक्षित आहे. हे प्रश्न पाहण्यासाठी तुम्हाला पुढील स्लाइड्सवर जावे लागेल.
ऑक्टोबरमध्ये फ्लोअरवर येईल दुसरा पार्ट-
'बाहुबली'च्या दुसरा पार्टचे शूटिंग 50% पूर्ण झाले आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, इतर भागाचे शूटिंग ऑक्टोबरमध्ये होणार आहे. सिनेमामध्ये भालाल देवाची भूमिका साकारणार राणा दुग्गबतीच्या सांगण्यानुसार, 'दोन ते तीन अॅक्शन ब्लॉक्स शूट करण्याचे बाकी आहे. त्यांचे शूटिंग 10 ते 15 ऑक्टोबरमध्ये सुरु होणार आहे.' राणा दुग्गबतीच्या सांगण्यानुसार, निर्मात्यांच्या सांगण्यानुसार, दोन्ही पार्ट्सचे शूटिंग एकाचवेळी करायचे होते, मात्र काही अडचणींमुळे असे होऊ शकले नाही.
राणा दुग्गबती सांगतो, 'आम्हाला दोन्ही पार्ट्सचे शूटिंग एकाचवेळी सुरु करायचे होते. मात्र माझ्या गुडघ्याला जखम झाली. त्यानंतर प्रभासच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली. या सर्व कारणास्तव सिनेमाचे शेड्यूल तीन-चार महिन्यांसाठी अटकले. एकिकडे पहिल्या पार्टला रिलीज होण्यासाठी उशीर झाला, तसेच दुस-या पार्टचे शूटिंगसुध्दा थांबवण्यात आले.' लेखक आणि दिग्दर्शक एस. एस. राजामौली या प्रोजेक्टवर मागीस पाच वर्षांपासून काम करत आहेत. पहिल्या पार्टप्रमाणेच दुसरा भागसुध्दा भव्य बनवण्यासाठी त्यांनी 200 कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले आहे. हा सिनेमा 2016मध्ये उन्हाळ्यात रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, दुस-या पार्टमध्ये कोण-कोणत्या प्रश्नाची उत्तरे मिळणे बाकी आहे...