आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाणे एेकवण्यासाठी बिग बींच्या बंगल्यात ‘बुलेट’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील जलसा बंगल्यात एक तरुण घुसल्याचा प्रकार रविवारी घडला. या प्रकरणी बुलेट बनवारीलाल यादव या २५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. बुलेट हा मूळ बिहार येथील रहिवासी असून सध्या तो पुण्यात राहतो, अशी माहिती समाेर अाली अाहे.

अमिताभ गेल्या अनेक वर्षांपासून दर रविवारी आपल्या जुहूच्या बंगल्यासमाेर अालेल्या चाहत्यांचे अभिवादन स्वीकारतात. ३१ जुलै रोजी अमिताभ नेहमीप्रमाणे चाहत्यांशी संवाद साधत होते. या वेळी सुरक्षा रक्षकांना चकवा देत बुलेटने भिंतीवरून उडी घेऊन बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच रक्षकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. गाणे ऐकवायचे होते : बुलेट हा अमिताभ यांचा मोठा चाहता असून तो भोजपुरी गायकही आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ यांना गाणे ऐकवण्याची आपली इच्छा होती. त्यामुळेच त्यांच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने पाेलिसांकडे दिलेल्या जबाबात सांगितले.
बातम्या आणखी आहेत...