आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FORBES: अॅक्ट्रेसेसमध्ये दीपिका पादुकोण 10 व्या क्रमांकावर, तब्बल 67 Cr कमवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- 'फोर्ब्स मॅगझिन'ने जगातील सर्वात जास्त मानधन घेणार्‍या व सर्वाधिक कमाई करणार्‍या अॅक्ट्रेसेसची यादी जाहीर केली आहे. यादीत बॉलिवूड अॅक्ट्रेस दीपिका पादुकोणला 10 व्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. दीपिकाने 67 कोटींची (1 कोटी डॉलर) कमाई केली असून फोर्ब्सच्या या यादीत स्थान मिळवणारी ती बॉलिवूडमध्ये एकमेव अॅक्ट्रेस आहे.

हॉलिवूडची अॅक्ट्रेस जेनिफर लॉरेंस हिने सलग दुसर्‍या वर्षीही अव्वल स्थान पटकावले आहे. दुसर्‍या क्रमांकावर मेलिसा मकार्थी असून स्कारलेट जॉनसन ही तिसर्‍या स्थानावर आहे.

दीपिका एकमेव न्यूकमर...
- लॉरेंस हिने यंदा 300 कोटी (4 कोटी डॉलर) रुपयांची कमाई केली आहे. 2015 च्या तुलनेत त्यात 11.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- मेलिसा मकार्थी हिने 3.3 कोटी डॉलरची कमाई केली आहे.
- 'कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर्स' फेम स्कारलेट जॉनसन हिने 2.5 कोटी डॉलरची कमाई केली आहे.
- यादीत दीपिका ही एकमेव न्यूकमर असून तिने 1 जून 2015 ते 1 जून 2016 या काळात 67 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

यादीतील टॉप 10 अॅक्ट्रेसेस...
1. जेनिफर लॉरेंस Rs. 300 कोटी
2. मेलिसा मकार्थी Rs. 221 कोटी
3. स्कॉरलेट जॉनसन Rs. 167 कोटी
4. जेनिफर एनिस्टन Rs. 140 कोटी
5. फैन बिंगबिंग Rs. 114 कोटी
6. चार्लीज थेरॉन Rs. 110 कोटी
7. एमी एडम्स Rs. 90 कोटी
8. जुलिया रॉबर्ट्स Rs. 80 कोटी
9. मिला कुनिस Rs. 73 कोटी
10 दीपिका पादुकोण Rs. 67 कोटी

पुढील स्लाइडवर पाहा, FORBESच्या Highest Paid अॅक्ट्रेसेसच्या यादीतील टॉप-3 अॅक्ट्रेेसस...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...