आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही अॅक्ट्रेसमध्ये जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत प्रियंका 8 वी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियंका आणि दीपिकाच्या कमाईच्या आकड्यांमध्ये 6 कोटी रुपयांचे अंतर आहे. - Divya Marathi
प्रियंका आणि दीपिकाच्या कमाईच्या आकड्यांमध्ये 6 कोटी रुपयांचे अंतर आहे.
मुंबई - फोर्ब्स मॅगझीनने जगातील सर्वाधिक फीस घेणाऱ्या आणि कमाई करणाऱ्या टीव्ही अॅक्ट्रेसेसची यादी प्रसिद्ध केली आहे. यात 73 कोटींच्या कमाईसह प्रियंका चोप्रा 8 व्या क्रमांकावर आहे. प्रियंका भारतातील पहिली टीव्ही अॅक्ट्रेस आहे, जी जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अॅक्ट्रेसच्या यादीत झळकली आहे.
प्रथम क्रमांकावर सोफिया वर्जारा
- फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या यादीत टीव्ही सीरिज 'मॉडर्न फॅमिली'ची कोलंबिया-अमेरिकन अॅक्ट्रेस सोफिया वर्जारा 288 कोटी रुपयांसह (43 मिलियन डॉलर) प्रथम क्रमांकावर आहे.
- दुसऱ्या क्रमांकावर आहे 'द बिग बँग थेअरी'ची अॅक्ट्रेस कॅली कुओका आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे, भारतीय वंशांची 'द मिंडी प्रोजेक्ट' शोची अॅक्ट्रेस मिंडी कॅलिंग.
- बॉलिवूड अभिनेत्री आणि अमेरिकन टीव्ही शो क्वांटिको मध्ये झळकलेली प्रियंका चोप्रा 73 कोटींच्या कमाईसह या यादीत 8 व्या क्रमांकावर आहे.
- प्रियंकाचे गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये 'बाजीराव मस्तानी' आणि 'जय गंगाजल' हे चित्रपट प्रदर्शित झाले होते.
- लवकरच ती हॉलिवूड मुव्ही बेवॉचमध्ये ड्वेन जॉन्सन, पामेला अँडरसन, जॅक एफ्रॉन आणि केली यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटातून ती हॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे.
- फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या या यादीसाठी अॅक्ट्रेसने जून 2015 ते जून 2016 मध्ये केलेल्या कमाईचा अंतर्भाव आहे.

दीपिकाला टाकले मागे
- ऑगस्टमध्ये फोर्ब्सने जगातील सर्वाधिक फीस घेणाऱ्या अॅक्ट्रेसेसची यादी प्रसिद्ध केली होती, त्यात दीपिका पादुकोण 10 व्या क्रमांकावर होती.
- जून 2015 ते जून 2016 या वर्षात दीपिकाची कमाई 67 कोटी रुपये झाल्याचे म्हटले होते.
- प्रियंका आणि दीपिकाच्या कमाईच्या आकड्यांमध्ये 6 कोटी रुपयांचे अंतर आहे. दीपिकानेही हॉलिवूड फिल्ममध्ये काम केलेले आहे. मात्र तिने टीव्ही शो केलेला नाही.
टॉप टेन अॅक्ट्रेसेसची कमाई
अॅक्ट्रेस कमाई (कोटींमध्ये)
1. सोफिया वर्जारा Rs. 288
2. कॅली कुओको Rs. 164
3. मिंडी कॅलिंग Rs. 100
4. एलेन पॉम्पियो आणि मॅरिस्का हार्टिगे Rs. 97
6. केरी वॉशिंग्टन Rs. 90
7. स्टॅना कॅटिक Rs. 80
8. प्रियंका चोप्रा Rs. 73
9. जुलियाना मारगुलिस Rs. 70
10. ज्यूली बॉवेन Rs. 67
पुढील स्लाइडमध्ये पाहा, टीव्हीतून कोट्यवधींची कमाई करणाऱ्या अॅक्ट्रेस...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...