आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सुल्तान\'पेक्षा शाहरुख \'रईस\', Forbesच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत 3 इंडियन सेलेब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘फोर्ब्ज’ने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जगातील 100 अशा कलाकारांची यादी जाहीर केली आहे ज्यांनी सर्वांत जास्त कमाई केलीये. ‘फोर्ब्ज’च्या 100 सर्वांत जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या या यादीत शाहरुख खान, सलमान आणि अक्षय कुमार या तीन भारतीय कलाकारांचा समावेश आहे. या यादीत शाहरुखला 65 वे, सलमानला 71 वे आणि अक्षय कुमारला 80 वे स्थान प्राप्त झाले आहे. एकुण कमाईत सलमान शाहरुखपेक्षा सात कोटींनी मागे आहे.   

शाहरुख सर्वाधिक मानधन घेणारा भारतीय अभिनेता... 
‘फोर्ब्ज’ मासिकाने सोमवारी ही यादी जाहीर केली. या यादीनुसार पुन्हा एकदा शाहरूख खान सर्वांत जास्त मानधन घेणारा भारतीय अभिनेता ठरला. ‘फोर्ब्ज’ मासिकेच्या आकड्यांनुसार मागील वर्षी किंग खान शाहरुखने 3.8 कोटी डॉलर म्हणजेच 245 कोटी रुपयांची वार्षिक कमाई केली आहे. तर सलमान खानने 3.7 कोटी डॉलर (238 कोटी) ची कमाई केली आहे. वर्षातून चार ते पाच सिनेमे करणाऱ्या अक्षय कुमारने मागील वर्षी 35.5 कोटी डॉलर (228 कोटी) ची कमाई केलीये. 

- ‘फोर्ब्जने लिहिले- "शाहरुखच्या 'रईस' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई केली आहे. याच कारणामुळे त्याच्या मानधनात वाढ झाली आहे. याशिवाय अनेक ब्रॅण्ड्सच्या जाहिरातींमध्ये तो झळकतो."

अमिताभ-धोनी सलग दुस-यांदा लिस्टबाहेर
- 2015 च्या यादीत सलमान, अमिताभ बच्चन आणि महेंद्र सिंह धोनी यांना 2016 च्या यादीत स्थान मिळाले नव्हते. सलमानची 2015 मध्ये कमाई 214 कोटी रुपये एवढी होती. यावर्षी 238 कोटींची कमाई करत ‘फोर्ब्ज’च्या यादीत पुन्हा स्थान पटकावले आहे. पण अमिताभ-धोनी यंदादेखील टॉप-100 मधून बाहेर आहेत.  
 
जगभरातील कोणकोणते सेलेब्स आहेत कमाईत पुढे 
- 837 कोटींची कमाई करणारा गायक शॉन कॉम्ब्स या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
- गायक आणि अभिनेता बेयोन्से 10.5 कोटी डॉलरच्या कमाईसह दोन क्रमांकाचे स्थान पटकावले आहे
-9.4 कोटी डॉलरची कमाई करणारी सुप्रसिद्ध लेखिका जे के रोलिंग ‘फोर्ब्ज’च्या या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
रँक  सेलेब  कमाईचा आकडा (कोटींमध्ये)
1 शॉन कॉम्ब्स, सिंगर  837 
2 बियॉन्से नोल्स, सिंगर 676
3  जेके रॉलिंग, ऑथर  612 
4  ड्रेक, सिंगर     605 
5  क्रिस्टियानो रोनाल्डो, फुटबॉलर 600
6  द वीकएंड, म्युझिशियन   592 
7 होवार्ड स्टर्न, पर्सनॅलिटीज  579 
8 कोल्डप्ले, म्युझिशियन  566 
9 जेम्स पॅटर्सन, ऑथर 450 
10  लेब्रन जेम्स, अॅथेलीट  206 
 
- ‘फोर्ब्ज’च्या या यादीत जगभरातील कलाकारांच्या 1 जून 2016 पासून 1 जून 2017 पर्यंतच्या कमाईचा उल्लेख आहे.             
बातम्या आणखी आहेत...