आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयचे यंदाच्या वर्षात चार चित्रपट झळकणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेल्यावर्षी ‘एअरलिफ्ट’, ‘रुस्तम’  आणि ‘हाऊसफुल्ल ३’ सारखे हिट  चित्रपट देऊन आपली यशाची चढती कमान कायम ठेवणाऱ्या अभिनेता अक्षय  कुमार याने त्याच्या २०१७ मध्ये येणाऱ्या चित्रपटांची माहिती नववर्षाच्या सुरुवातीला आपल्या चाहत्यांना दिली.  
यंदाच्या वर्षात  खिलाडी कुमारचे ‘जॉली एलएलबी २’, ‘टॉयलेट एक प्रेमकथा’, ‘२.०’ आणि पॅडमॅन हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 

अक्षयने टि्वटरवर सांगितले, 
‘जॉली एलएलबी २’ हा चित्रपट येत्या १० फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष कुमार यांनी केले आहे. तसेच यात हुमा कुरेशी आणि अन्नू कपूर यांची भूमिका असणार आहे. ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा चित्रपट स्वच्छ भारत अभियान या मोहिमेवर आधारित असेल. यात त्याच्यासोबत भूमी पेडणेकर दिसणार आहे.  या चित्रपटातून आपण सामाजिक संदेश देणार असल्याचे त्याने या वेळी सांगितले. अक्षय पुढे म्हणाला, सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत काम करण्याची गेल्या काही वर्षांपासूनची इच्छा होती. आता ‘२.०’ चित्रपटाच्या निमित्ताने ती पूर्ण होत आहे. या चित्रपटात तंत्रज्ञानाचा भरपूर  वापर करण्यात आला आहे. रजनी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अतिशय अविस्मरणीय होता, असेही त्याने सांगितले. तसेच वर्षाच्या शेवटी आर. बाल्की यांच्यासोबत अक्षयचा ‘पॅडमॅन’ हा  चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...