आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Business deal: फॉक्स आणि टी-सीरीजने केला चार सिनेमांसाठी करार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2015-16 या वर्षांत रिलीज होणा-या आगामी चार हिंदी सिनेमांचे निर्माते फॉक्स स्टार स्टुडिओजने सिनेमाच्या संगीत हक्कांसाठी टी-सीरीजसोबत करार केला आहे. टी-सीरीज या सिनेमांच्या संगीताचे मार्केटिंग करणारेय. यामध्ये सर्वात मोठा सिनेमा हा सलमान खान स्टारर आहे.
सूरज बडजात्या दिग्दर्शित 'प्रेम रतन धन पायो' हा सिनेमा 12 नोव्हेंबर रोजी रिलीज होणारेय. यामध्ये सलमान खानसह सोनम कपूर, नील नितीन मुकेश आणि अनुपम खेर यांच्या भूमिका आहेत. 'मैंने प्यार किया', 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है' या सिनेमांनंतर सलमान आणि सूरज या हीट जोडीच्या सिनेमाची प्रतिक्षा त्यांचे चाहते करत आहे.
याशिवाय 2016मध्ये नीरज पांडे दिग्दर्शित आणि सुशांत सिंह स्टारर सिनेमाचाही करार करण्यात आला आहे. हा सिनेमा महेंद्र सिंह धोनीच्या आयुष्यावर बेतला आहे. तिसरा सिनेमा हा बायोपिक असून यामध्ये सोनम कपूर फ्लाइट अटेंडेंट नीरजा भनोतची भूमिका वठवणारेय.
या कराराअंतर्गत चौथा सिनेमा हा सोनाक्षी सिन्हाचा अॅक्शन एन्टरटेनर आहे. 'गजनी' फेम ए.आर. मुरुगदार यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून सोनाक्षी यामध्ये अॅक्शन अवतारात दिसणारेय. या करारानुसार, टी-सीरीज या सिनेमांच्या संगीताचे मार्केटिंग करणार असून गाणीही तयार करणार आहे.