आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • From Salman To Priyanka, Have A Sneak Peek At Bollywood Stars And Their Ganpati Pujan

सलमान खानच्‍या घरी का केली आणि केव्‍हापासून जाते गणेश स्‍थापना, वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशभर धूमधडाक्‍यात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यात बॉलीवूड सेलेब्ससुद्धा आघाडीवर आहेत. आपल्‍या व्‍यस्‍त वेळापत्रकातून अनेक बॉलिवूड कलाकार श्री गणेशाची स्‍थापना करतात. यात सलमान खानचाही समावेश आहे. सलमान आपल्‍या घरी 'श्रीं'ची आराधना केव्‍हापासून करत आहे, याची खासी माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
बहीण अर्पितामुळे गणेशोत्‍सव
सलमानच्‍या घरात (गॅलेक्सी अपार्टमेंट) एक मंदिर आहे. याच ठिकाणी दरवर्षी त्‍याचे कुटुंबीय गणेशाची स्‍थापना करते. सलमानने सांगितले, अनेक वर्षांपासून आम्‍ही मनोभावे गणेशाची स्‍थापना करतो. माझी बहीण अर्पितामुळे त्‍याची सुरुवात झाली. आपणही इतरांप्रमाणे घरात गणपती मांडवा, असे अर्पिताला वाटत होते. तिच्‍या इच्‍छापूर्तीसाठी आम्‍ही पहिल्‍यांदा घरी गणपती आणला होता. ही परंपरा तिच्‍या लग्‍नानंतरही सुरू आहे.
सलमान गणेशाचा भक्‍त...
सलमान म्‍हणाला, माझी गणेशावर खूप श्रद्धा आहे. मी स्‍वत:ला गणपतीचा स्‍पेशल भक्‍त मानतो. मागील काही वर्षांत माझ्यावर अनेक संकटं आलीत. पण, त्‍यातूनही मी सहीसलमात सुटलो ते त्‍याच्‍यामुळेच.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर स्टार्स कसे करतात गणपती पूजन.
बातम्या आणखी आहेत...