आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्तांबूलच्या हल्ल्यात ठार झालेल्या निर्मात्याच्या अंत्यसंस्कारात रवीनासह पोहोचले अनेक कलाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबीस रिजवी यांचा फोटो, दुस-या फोटोत अंत्यसंस्काराला पती अनिल थडानीसोबत पोहोचलेली रवीना टंडन - Divya Marathi
अबीस रिजवी यांचा फोटो, दुस-या फोटोत अंत्यसंस्काराला पती अनिल थडानीसोबत पोहोचलेली रवीना टंडन
मुंबईः इस्तांबूलच्या रियान नाइट क्लबमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 'रोर' चित्रपटाचे निर्माते अबीस रिझवी यांचा मृत्यू झाला. त्यांना बुधवारी मजगाव स्थित कब्रिस्तानात सुपुर्द ए खाक करण्यात आले.  अबीस हे माजी राज्यसभा खासदार अख्तर रिझवी यांचे पुत्र होते. अबीर रिझवी यांना अखेरचा निरोप द्यायला  बॉलिवूडमधील अनेक कलाकार आले होते. रवीना टंडन, अर्शद वारसी, जावेद जाफरी, अबु आजमी, सलमानची बहीण अलविरा आणि तिचे पती अतुल अग्निहोत्री, अब्बास-मस्तान, नावेद जाफरी, जय भानुशाली आणि रवीना टंडनचे पती अनिल थडानी अबीस यांच्या अंत्यसंस्कारात सामील झाले होते. 

दहशतवादी हल्ल्यात खुशी शाहचासुद्धा झाला मृत्यू..
गुजरातच्या खुशी शाह हिचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी हल्ल्यात ठार झालेल्या दोन्ही भारतीयांच्या कुटुंबीयांशी फोनवर चर्चाही केली होती. 
 
सेलिब्रिटी सर्कलमध्ये प्रसिद्ध होते अबीस..
- इस्तानबूल हल्ल्यात ठार झालेले अबीस हसन माजी राज्यसभा खासदार अख्तर हसन रिझवी यांचे पुत्र आणि रिझवी बिल्डर्सचे सीईओदेखिल होती. 
- अबीस बॉलीवूड डायरेक्टर/प्रोड्यूसरही होते. सेलिब्रिटी सर्कलमध्येही अबिस फेमस होते. 
- अबीस यांनी 'रोर: टायगर ऑफ सुंदरबन' चित्रपटाची निर्मिती केली होती. सलमानने या चित्रपटाचे प्रमोशन केले होते. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार अबीस मित्रांबरोबर न्यू ईयर सलिब्रेशनसाठी मित्रांबरोबर तुर्कस्तानात गेले होते.
 
रायफलद्वारे फायरिंग..
- तुर्कस्तानचे गृहमंत्री सुलेमान सोयलू यांच्या मते, हलल्यात 39 लोक ठार झाले आहेत. त्यापैकी 21 जणांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये 16 विदेशी आणि 5 तुर्कस्तानातील नागरिक होते. 
- स्थानिक वेळेनुसार रात्री सुमारे 1.45 वाजता सँटा क्लॉजच्या ड्रेसमध्ये आलेल्या एका हल्लेखोराने रायफलद्वारे लोकांवर फायरिंग सुरू केले. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार हल्लेखोरांनी क्लबमध्ये प्रवेश करण्यापूर्वी पोलिसांवर फायरिंग केली. त्यानंतर ते क्लबमध्येही अंधाधुंद फायरिंग करू लागले. हल्ल्याच्यावेळी क्लबमध्ये 700 ते 800 लोक होते.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, अबीस रिजवी यांच्या अंत्यसंस्कारत सामील झालेल्या कलाकारांचे Photos...
बातम्या आणखी आहेत...