आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे 'शोले'च्या गब्बर सिंगचा मुलगा, क्रिकेट क्षेत्रात करायचे आहे करिअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः 15 ऑगस्ट 1975 रोजी रिलीज झालेल्या आणि ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'शोले' या सिनेमाच्या रिलीजला 40 वर्षे पूर्ण झाली आहेत. सिनेमात दिवंगत अभिनेते अमजद खान यांनी डाकू गब्बर सिंगची भूमिका वठवली होती. या भूमिकेनंतर ते इंडस्ट्रीत यशस्वी अभिनेता म्हणून नावारुपास आले होते. अमजद खान यांचा मुलगा सीमाब खानला क्रिकेटमध्ये त्याला आपले करिअर करायचे आहे. 16 ऑगस्ट रोजी सीमाब एका टुर्नामेंटमध्ये मुंबईतील माहुल परिसरात दरबार युनियनतर्फे मैदानावर बॉलिंग करताना दिसला. या शिवाजी पार्क यंगस्टर्स या टीमविरोधात सीमाब खेळत होता.
7 आठवड्यात कमी केले 12 किलो वजन
33 वर्षीय सीमाबने 7 आठवड्यात 12 किलो वजन कमी केल आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले, आयुष्यात एकदा तरी मुंबईकडून क्रिेकेट सामना खेळण्याचे माझे स्वप्न आहे.
अभिनेतासुद्धा आहे सीमाब
सीमाब केवळ क्रिकेटरच नव्हे तर अभिनेतासुद्धा आहे. 2013 मध्ये साजिद खान दिग्दर्शित 'हिम्मतवाला' या सिनेमाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा 1993 मध्ये आलेल्या 'हिम्मतवाला'चा रिमेक असून यामध्ये अमजद खान यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सीमाबची निवडक छायाचित्रे...