आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बीं'ना 5 कोटी न देणे 'झा'ला पडले महागात, 'गंगाजल 2'ला मिळाली poor opening

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या शुक्रवारी (4 मार्च) रिलीज झालेल्या 'गंगाजल 2' सिनेमात प्रियांका चोप्रासोबत एक महत्वाची भूमिका अमिताभ बच्चन करणार होते. परंतु त्यांना मानधन मंजूर नव्हते, म्हणून ही भूमिका झा यांनी केली. पहिल्या दिवशी केवळ 3 कोटींचा गल्ला जमवणा-या या सिनेमाचे नुकसान होणार असल्याचे दिसतेय.
बॉक्स ऑफिसवर सिनेमाने पहिल्या दिवशी 3 कोटींचा बिझनेस केला. हा बिझनेस खूप कमी आहे. हा सिनेमा भारतात 22 कोटी करेल अशा अपेक्षा आहेत. त्यातील निर्माती कंपनी प्ले एंटरटेन्मेंटला 11 कोटी रुपये मिळतील.
ओव्हरसीजमधून 2 कोटी, संगीताचे 1 कोटी आणि टीव्ही प्रदर्शनाच्या अधिकाराचे जास्तित जास्त 5 कोटी रुपये मिळू शकतात. निर्मात्याची पूर्ण खर्च केवळ 19 कोटीं, अर्थातच सिनेमा पैशांच्या बाबतीत फ्लॉप ठरेल.
'आरक्षण’ आणि 'सत्याग्रह’ सिनेमानंतर दिग्दर्शक प्रकाश झा यांनी अमिताभ बच्चन यांना हा सिनेमा ऑफर केला होता. त्यांना पात्र आणि कथा पसंत पडली, मात्र मानधनामुळे त्यांनी हा सिनेमा करण्यास नकार दिला. बच्चन यांचे पात्र तीन वर्षांपासून पोलीस खात्यात काम करणा-या डीएसपीचे होते.
मुख्य भूमिका महिला पोलिस अधिका-याची होती. कथा ऐकवण्यात अनेक दिवस गेले. जेव्हा करार करण्याची वेळ आली तेव्हा 5 बच्चन यांनी 5 कोटी मानधन ठरवले. तसे पाहता, अमिताभ सिनेमांसाठी 10 कोटींचे मानधन आणि नफ्यात भागीदारीसुध्दा घेतात.
हा वाटा सिनेमाच्या बजेटवर अवलंबून असतो. झा यांना आपल्या विषयासंबंधीच्या सिनेमासाठी 5 कोटी मानधन घेणे मान्य नव्हते. सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'त्यांचे म्हणणे होते, की सिनेमाचे मर्यादित बजटे होते. म्हणून अमितजींनी मानधन कमी करायला हवे होते.'
अमिताभ यांनी झा यांच्या दोन अपयशी सिनेमांनंतरदेखील झा यांचा प्रस्ताव स्वीकारला आणि मानधनसुध्दा कमी केले. अखेर अमिताभ यांनी नकार दिल्यानंतर झा स्वत: अभिनयात आले. मात्र, झा यांच्या सांगण्यानुसार, त्यांना आव्हानात्मक काहीतरी करायचे होते. म्हणून अभिनय केला. त्यांनी सिनेमाचे नुकसान केले? नाना पाटेकर किंवा मनोज वाजपेयी यांच्या नावाचा विचार का केला नाही? यावर स्पष्टपणे म्हणतात, 'माझ्या सिनेमाची स्टार व्हॅल्यू फक्त प्रियांका चोप्राशी आहे. कुणी दुसरे असण्याने अथवा नसण्याने काहीच फरक पडत नाही.' बच्चन यांना सिनेमा ऑफर करण्याचा प्रश्नच त्यांनी बाजूला सावरला.