आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गँग्स ऑफ सूरत'चे शूटिंग सुरु, पाहा On Locationची छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('गँग्स ऑफ सूरत' या सिनेमाचे शूटिंग करताना गुजराती कलाकार)

सूरतः बॉलिवूड सिनेमांच्या तोडीस तोड देणा-या एका गुजराती सिनेमाच्या शूटिंगला सूरत येथे सुरुवात झाली आहे. तब्बल 288 कलाकार असलेल्या या सिनेमाचे नाव आहे गँग्स ऑफ सूरत. हिंदी सिनेमांमध्ये असलेला सस्पेन्स, ड्रामा, रोमान्स, मारधाड, कॉमेडीचा तडका या सिनेमात असणार आहे. गुजरातीमध्ये पहिल्यांदाच एवढा भव्य सिनेमा तयार होतोय. गुजरातमधील स्थानिक कलाकारांना या सिनेमात अभिनयाची संधी देण्यात आली आहे.
'गँग्स ऑफ सूरत' या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत अतुल सोनी. या सिनेमात एनिमेशनचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार असल्याचे अतुल सोनी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. या सिनेमात एकुण चार गाणी असून आयटम साँगचा तडकासुद्धा या सिनेमात असणार आहे.
या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला गँग्स ऑफ सूरत या सिनेमाच्या ऑन लोकेशनची खास झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.