एंटरटेनमेंट डेस्क - यंदाचा गणेशोत्सव संजूबाबासाठी खास ठरला. लवकरच त्याचा चित्रपट 'भूमी' रिलीज होत आहे. या चित्रपटातील त्याच्या आाजातील आरती गणेश स्थापनेच्या दिवशी रिलीज करण्यात आली. संजय दत्तच्या घरीही गणरायाची स्थापना करण्यात आली होती. तसेच त्याने गणपतीच्या दर्शनासाठी सेलिब्रिटींनी आमंत्रित करून गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजराही केला. संजय दत्तने त्याच्या घरी दीड दिवसाच्या गणरायाची स्थापना केली होती. त्याचे विसर्जनही संजय दत्तने संपूर्ण कुंटुंबासह केले. यावेळी संजय दत्तबरोबर त्याची पत्नी मान्यता आणि दोन्ही मुलेही होती. चला तर मग पाहुयात संजय दत्तने कसे केले बाप्पाचे विसर्जन.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संजय दत्तचे विसर्जनाचे PHOTOS...