आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भज्जीसोबत लग्न करण्याची गीताला मूळीच इच्छा नव्हती, म्हणाली होती, \'दूसरी शोध\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नावेळी हरभजन सिंह आणि गीता बसरा
मुंबई- बॉलिवू़ड अभिनेत्री गीता बसरा आणि तिचा क्रिकेटर पती हरभजन सिंहने लग्न केल्यानंतर पहिल्या मुलाखतीत त्यांच्या लव्ह लाइफविषयी अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी ही मुलाखत एका प्रतिष्ठीत वेबसाइटला दिली होती. गीताने या मुलाखतीत सांगितले, की तिला कधीच रिलेशनशिपमध्ये पडण्यात रुची नव्हती. गीताने पुढे सांगितले, 'मी भारतात नवीन होते आणि इंडस्ट्रीमध्येही इतकी ओळख नव्हती. 'द ट्रेन' रिलीज होऊन काहीच दिवस झाले होते आणि माझे लक्ष करिअरवर होते. मला माहित होते, की जर मी रिलेशनशिपमध्ये पडले तर सर्व काही बदलेल. हरभजनने माझा 10 महिने पाठलाग केला. मला वाटते, की आम्हाला जवळ आणण्यात माध्यमांचा मोठा वाटा आहे. एकेदिवशी मला जाणीव झाली, की हरभजन चांगला व्यक्ती आहे आणि त्याच्यापेक्षा चांगला जोडीदार मला मिळून शकणार नाही. माझ्या फ्रेंड्सनाही तो आवडत होता आणि त्यांनाच मला या नात्यात पुढे जाण्यास सांगितले.'
भज्जीला म्हणाली, 'दुसरी शोध आणि लग्न कर'
गीताने या मुलाखतीत सांगितेल, की तिने एकदा हरभजनला दुसरी मुलगी शोधून तिच्याशी लग्न करण्याचा सल्ला दिला होता. ती सांगते, 'एकदा मी त्याला म्हणाले होते, की माझ्याशी बोलू नकोस. मी माझ्या रस्त्याने जाईल आणि तू तुझ्या रस्त्याने जावे. मी त्याला म्हणाले होते, दुसरी मुलगी शोधून लग्न कर. त्यावेळी हरभजनला माझ्याशी लग्न करायचे होते. परंतु मला त्याच्याशी लग्न करण्याची मूळीच इच्छा नव्हती. परंतु आमच्या नशीबात वेगळेच लिहिलेले होते. जे व्हायचे होते ते झाले. काही महिन्यांनंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.'
हरभजनने सांगितली 'लव्हस्टोरी'-
मुलाखतीत हरभजन सिंहने त्यांची लव्हस्टोरी सांगितले. त्याने सांगितले, 'मी गीताला 'वो अजनबी' गाण्यात पाहिले होते, त्यावेळी मी लंडनमध्ये कंट्री क्रिकेट खेळत होतो. मी माझ्या मित्रांना म्हणालो, की मला या तरुणीला भेटायचे आहे. मी बॉलिवू़डमध्ये अनेकांना ओळखत होतो. परंतु जवळचे मित्र परिवार नव्हता. मी माझ्या काही मित्रांना म्हणालो, 'मला हिला भेटायच आहे यार. कोण आहे ही?' जेव्हा आम्ही दक्षिण आफ्रिकेला गेलो आणि टी-20 वर्ल्डकप जिंकलो, तेव्हा एका फ्रेंडकडून गीताचा नंबर मिळाला. मी त्या नंबरवर मेसेज केला, 'मी हरभजन सिंह भारतीय क्रिकेटर आहे आणि तुम्हाला चहा किंवा कॉफीवेळी भेटायचे आहे. परंतु तीन-चार दिवस झाले रिप्लाय आलाच नाही. जेव्हा आम्ही दक्षिणा आफ्रिकेहून रवाना झालो तेव्हा तिचा रिप्लाय मिळाला. तिने मेसेजमध्ये लिहिले होते, 'टी-20 वर्ल्डकप जिंकलात त्याबद्दल अभिनंदन. आम्हाला सर्वांना तुमच्या अभिमान आहे.' मी म्हणालो, 'WOW मी जे विचारले होते, त्यावर किती छान उत्तर मिळाले.' नंतर आयपीएलचे पहिले सीझन सुरु होणार होते, तेव्हा तिने मला मेसेज केला, 'मला दोन तिकीट हवे आहेत'. मी म्हणालो, 'ओक तिकीट तर देईलच.' आयपीएलदरम्याव आमची पहिली भेट झाली. मला वाटते, गीताने विचार केला असेल तिकीट दिलेय तर एकदा भेटायला काय हरकत आहे. आम्ही कॉफी घेण्यासाठी गेलो आणि फ्रेंड्स झालो. त्यानंतर आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. गीताने मला खूप वाट पाहायला लावली आणि म्हणाली, 'आपण आधी मित्र होऊया रिलेशनशिपविषयी नंतर विचार करू.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गीता आणि हरभजनच्या लग्नचे काही फोटो...