आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासूच्या सांगण्यावरुन \'तो\' कपडे फाडून करायचा बलात्कार, वाचा बॉलिवूडमधल्या या महिलेची व्यथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलाकारांनी केलेल्या मारधाडीच्या दृश्यावर आपण टाळ्या वाजवतो. त्याने खलनायकाला मारताना केलेल्या हाणामारीचे कौतुक करतो. मात्र, हीरोच्या नावाखाली असे काम करणारे दुसरेच कलाकार असतात. अभिनेत्रींबाबतही तसेच असते. त्यांच्या नावाखाली दाखविण्यात येणारे स्टंट दुसऱ्याच महिला कलाकाराने केलेले असतात. अशीच एक स्टंटवुमन आहे गीता टंडन. करीना कपूरपासून ते आलिया भटपर्यंत बॉलिवूडच्या अनेक आघाडीच्या अभिनेत्रींसाठी तिने स्टंट वुमेन म्हणून काम केले आहे. आज जरी गीता एक चांगले आयुष्य जगत असली, तरी यशस्वी स्टंटवुमन बनण्याचा तिचा प्रवास काही सोपी नव्हता.

वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी गीताचे लग्न झाले आणि एवढ्या कमी वयातच नरकयातना तिच्या वाट्याला आल्या. लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्न रंगवणा-या गीताची सगळी स्वप्न धुळीस मिळाली. रात्र झाली, की तिच्या अंगावर काटा उभा राहू लागला. कारण रात्रीतून होणारा छळ ती सोसू शकत नव्हती. सासूमध्ये आईचे रुप बघणा-या गीताला तिच्यामुळेच नरकयातना सोसाव्या लागल्या.
याच गीताच्या जीवनावर आधारित एक शॉर्ट फिल्म रिलीज झाली. यामध्ये तिचा संघर्ष तिच्याकडून ऐकायला मिळाला. या 15 मिनिटांच्या शॉर्टफिल्ममध्ये गीताने आपबिती कथन केली आहे. वयाच्या 10 वर्षी तिच्या आईचे निधन झाले होते. 15 वर्षांची असताना वडिलांनी एक चांगला मुलगा शोधून तिचे लग्न लावून दिले. मात्र लग्नानंतर सासरच्यांचा जाच सुरु झाला. नवरा तिला मारहाण करायचा. सासूच्या सांगण्यावरुन तिचे कपडे फाडून तिच्यावर बलात्कार करायचा. सिलेंडर उचलून मारायचा प्रयत्न करायचा.

गीता या नरकातून कशी बाहेर पडली, आपल्या दोन मुलांचा सांभाळ तिने कसा केला, सिनेमांविषयी फारशी माहिती नसताना ती एक यशस्वी स्टंटवुमन कशी बनली, जाणून घेण्यासाठी वाचा, गीताची संपूर्ण कहाणी आणि अकराव्या स्लाईडमध्ये बघा तिच्या शॉर्ट फिल्मचा व्हिडिओ... आणि सोबतच बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतची खास छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...