आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटांना वयाच्या अटीचे प्रमाणपत्र द्या, करण जोहरचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोवा - आपण अजूनही ब्रिटिशांनी बनवलेल्या कायद्यानुसार चालतो, मात्र चित्रपटांच्या सेन्सॉरशिपचे कायदे आपले असून ते अत्यंत वेगळे आहेत, त्यामुळे आम्हा निर्मात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खरे तर चित्रपटांना सेन्सॉरशिप नसावी, त्यांनी फक्त वयाची अट टाकणारे प्रमाणपत्र द्यावे, असे स्पष्ट मत प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक आणि आता अभिनयाच्या क्षेत्रात उतरलेल्या करण जोहरने खास "दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केले.
सध्याच्या सेन्सॉरशिपबद्दल करणने मोहीम उघडली असून या मोहिमेबद्दल विचारले असता करण म्हणाला, आम्ही जेव्हा चित्रपट बनवतो तेव्हा आम्हाला ठाऊक असते की आम्ही कोणासाठी बनवतोय. प्रौढांसाठीच्या चित्रपटात त्यांच्यासाठी योग्य असलेल्या गोष्टीच असतात. हॉलीवूडमध्ये सेन्सॉरशिप नाही, तर इंग्लंडमध्ये १२, १५ आणि १८ वर्षांसाठीचे चित्रपट असे प्रमाणपत्र देतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की, त्या वयांच्या मुलांसाठी तो चित्रपट योग्य आहे. सेन्सॉर बोर्डाने सेन्सॉरशिप करण्याऐवजी फक्त अशा प्रकारचे प्रमाणपत्र देण्याचे काम करावे, असे आम्हाला वाटते.

'बॉम्बे वेलवेट'मधील भूमिका इमेजविरुद्ध
निर्माता-दिग्दर्शक म्हणून आपले नाव स्थापित केल्यानंतर आता करण जोहर फॉक्स स्टार निर्मित आणि अनुराग कश्यप दिग्दर्शत "बॉम्बे वेलवेट' चित्रपटातून खलनायकाच्या रूपात दिसणार आहे. आपल्या या नव्या भूमिकेविषयी बोलताना करणने सांगितले की, मी अनेक चित्रपट निर्माण केले, दिग्दर्शनही केले; परंतु आपण पडद्यावर महत्त्वाची भूमिका साकारावी, असे मला कधीही वाटले नाही. मात्र, जेव्हा अनुराग कश्यपने मला "बॉम्बे वेलवेट'मध्ये मुख्य खलनायकाच्या भूमिकेबद्दल िचारले, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले, कारण मी प्रेमळ प्रकृतीचा माणूस आहे.