आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Interview: 10वीच्या क्लासमध्ये लठ्ठपणामुळे लाजीरवाणी व्हायची गोविंदाची मुलगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- टीना अहूजा)
मुंबई- आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा आणि सोनम कपूरसारख्या स्टार्स डॉटर्सनंतर आता गोविंदाची मुलगी नर्मदा अर्थातच टीना अहूजासुध्दा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. मात्र, इतर स्टार किड्सच्या तुलनेत टीनाला वजन कमी करण्याची गरज भासणार नाही. 'सेकंड हँड हसबँड' सिनेमानिमित्त टीनाने अलीकडेच divyamarathi.comसोबत बातचीत केली. यादरम्यान तिने आपल्या फिटनेस आणि आयुष्याशी निगडीत काही गोष्टी शेअर केल्या. जाणून घेऊया टीनाविषयी...
तू नेहमी फिट होतीस की बॉलिवू़डमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्वत:ला परफेक्ट केलेस?
- नाही, नाही... मी पहिल्यापासून फिट आहे. डायटच्या बाबतीत माझा कोणताच चार्ट नाहीये. आपल्या पसंत आणि वेळेनुसार, डायट बदलत असते. वर्कआऊटविषयी बोलायचे झाले तर मी 14 वर्षांपासून करत आहे. कारण बालपणी मी खूप लठ्ठ होते. मी फिरणे आणि ट्रेडमिलवर चालण्यास सुरुवात केली. नंतर आई-वडिलांनी मला जिम ज्वॉइन करण्यास सांगितले. लहानपणापासून मी फिटनेसची लव्हर आहे. मी फ्रिक नाहीये, परंतु वर्कआऊटबाबत इमानदार आहे.
बालपणी लठ्ठ असल्याने तुला चिडवल्याने लाजीरवाणे व्हावे लागले?
- अनेकदा असे झाले. 10वीच्या वर्गात असताना मी माझ्या वजनाने कधीच साडी परिधान करू शकत नव्हते. म्हणून मी कधीच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेत नव्हते. मला खूप लाज वाटायची. लठ्ठपणामुळे मला अनेकदा अशा प्रसंगांना सामोरे जावे लागत होते.
तुझ्या दिवसाची सुरुवात कशी होते?
- मी दिवसाची सुरुवात एका ग्लास गरम पाण्याने करते. जवळपास अर्ध्या तासाने 5 बादाम आणि भांज्यांचा ज्यूस पिते. त्यानंतर मी चहा किंवा कॉफी घेते.
तू ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरमध्ये काय खातेस?
ब्रेकफास्ट- दूधासोबत अर्धा टोस्ट, ओट्स तसेच 3-4 अंडे. टोस्ट किंवा ओट्सऐवजी सँडविच किंवा ब्रेडची स्लाइससुध्दा घेते.
लंच- भात, सर्व प्रकारच्या भाज्या (प्रत्येक दिवशी वेग-वेगळी) आणि दाळ किंवा एक बाजरीची भाकर तसेच दहीसोबत मल्टीग्रेन चपाती.
इव्हिनिंग स्नॅक्स (जवळपास 4 वाजता)- 5 बादाम, अंडे किंवा व्हिजिटेबल ऑमलेट किंवा व्हिजिटेबल ज्यूस.
इव्हिनिंग फूज (जवळपास 7 वाजता)- जवळपास 100 ग्रॅम चिकन किंवा मासे.
डिनर- घरात तयार केलेल्या सर्व भाज्या आणि दही. डिनरमध्ये भात किंवा चपाती खात नाही. रात्री झोपताना मला भूक लागल्यास मी 10-15 बादाम किंवा अक्रोड खाते. जर जास्त भूक लागलेली असेल तर एक ग्लास दूध पिते.
कधी डायटसोबत चिटींग करतेस का?
- अनेकदा आणि अनेक गोष्टींसाठी. मला पिज्जा, पास्त आणि इतर प्रकारचे फॅटी फूड्स खूप आवडतात. सोबतच केक आणि पेस्ट्रीजसुध्दा आवडतात. जेव्हा इच्छा होते, तेव्हा डायट विसरून हे पदार्थ खाऊन घेते.
तुझे वर्कआऊट शेड्यूल कसे आहे?
- मी योगा आणि पायलेट्स करते. सुरुवातीला मी वेट ट्रेनिंग घेत होते, परंतु आता नाही घेत. मला आणखी वजन कमी करायचे आहे. मला सूर्य नमस्कार करायला आवडते. मी पोस्टर्स आणि पायलेट्स खूप एन्जॉय करते. माझी पर्सनल ट्रेनर आहे, ती माझ्याकडून व्यायाम करून घेते. मला चालायला आवडते आणि 45 मिनीटांचा टाइम लावून चालते. मी धावत नाही. जेव्हा कधी व्यायाम करू शकत नाही, तेव्हा एक तास व़किंग करते. संपूर्ण दिवसात 1 तास 10 मिनीट वर्कआऊट करते.
कोणत्या अॅक्टर अॅक्ट्रेसकडून प्रेरणा घेतेस?
- अॅक्टर्सविषयी सांगायचे झाले तर आजकाल एकाविषयी सांगणे कठिण आहे. कारण प्रत्येकजण फिट आहे. जर एखाद्याविषयी सांगायचेच असेल तर मी अक्षय कुमारचे नाव घेईल. त्याची बॉडी चांगली.
राहिला प्रश्न अॅक्ट्रेसचा तर सर्व आरोग्याविषयी गंभीर आहेत. ज्या अभिनेत्री आई झाल्यानंतरसुध्दा फिट आहेत, मी त्यांच्याकडून प्रेरणा घेते. उदाहरणार्थ, करिश्मा कपूर. ती दोन मुलांची आई आणि मुलांच्या जन्मानंतरसुध्दा तिने खूप लवकर स्वत:ला फिट केले. मलायका अरोरा खानसुध्दा खूप फिट आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गोविंदाची मुलगी टीनाचे ग्लॅमरस फोटो...