आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हेट स्टोरी 3'मध्ये शरमनच्या जागी गुरमित चौधरीची वर्णी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'3 इडियट्स' आणि 'रंग दे बसंती' सारख्या चित्रपटाचा अभिनेता शरमन जोशीची 'हेट स्टोरी 3'मधील निवड ही जशी आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती तसेच या चित्रपटामधून त्याचे बाहेर पडणे तितकेच साहजिक होते. डेट्सची अडचण असल्याने या चित्रपटातून बाहेर पडलो असल्याचे शरमनने सांगितले. 'हेट स्टोरी 3'च्या शूटिंगसोबत त्याच्या दोन चित्रपटांचे शूटिंग शेड्यूल सुरू होणार आहेत.
दुसरीकडे 'हेट स्टोरी..'चे दिग्दर्शक विशाल पंड्या यांनी नेमकी शरमनच्या विरोधात प्रतिक्रिया दिली आहे. शरमनला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय आम्हीच घेतला असल्याचे त्याने म्हटले. अंतिम स्क्रिप्टची निवड झाल्यानंतर शरमन या भूमिकेत फिट दिसणार नसल्याचे दिग्दर्शकांच्या लक्षात आले. आता या भूमिकेसाठी 'खामोशियां'मध्ये दिसलेल्या गुरमित चौधरीची निवड करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...