आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता चित्रपट बनवू शकणार नाही राम रहीम, CINTAA ने रद्द केले वर्क परमिट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बलात्कार प्रकरणी 20 वर्षांसाठी तुरुंगात गेलेल्या राम रहीमला आणखी एक मोठा झटका बसला आहे. भविष्यात आता कधीही राम रहीम चित्रपट बनवू शकणार नाही.  याचे कारण म्हणजे सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन (CINTAA)  ने त्याचे वर्क परमिट रद्द केले आहे. राम रहीम बलात्कार प्रकरणी दोषी सिद्ध झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याचवर्षी ऑगस्ट महिन्यात राम रहीमने त्याचा आगामी चित्रपट 'ऑनलाइन गुरुकुल'चे मोशन पोस्टर रिलीज केले होते. वर्क परमिट रद्द झाल्याने आता हा चित्रपट पूर्ण होऊ शकणार नाही. 
 
IFTDA नेसुद्धा रद्द केले सदस्यत्व...
- राम रहीमवर केवळ CINTAA नेच नव्हे तर इंडियन फिल्म अँड टेलीविजन डायरेक्टर्स असोसिएशन (IFTDA) नेही कारवाई केली आहे. IFTDA ने राम रहीम आणि त्याची दत्तक मुलगी हनीप्रीतचे सदस्यत्व रद्द केले आहे. अर्थात आता हनीप्रीतलादेखील चित्रपट बनवण्याचे अधिकार नाहीत.  
- IFTDA चे सदस्यत्व असताना हनीप्रीतने राम रहीमसोबत 'MSG : द वॉरियर लॉयन हार्ट' (2016), 'हिंद का नापाक को जवाब : MSG लॉयन हार्ट 2' (2017) आणि 'जट्टू इंजीनियर' (2017) हे चित्रपट दिग्दर्शित केले होते.
 
बाबाला 20 वर्षांची शिक्षा..
- बाबा राम रहीमला दोन बलात्कार प्रकरणांमध्ये प्रत्येकी 10-10 वर्षे म्हणजे एकूण 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 
- दोन साध्वींच्या बलात्कार प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला. तर दोन्ही पीडितांना प्रत्येकी 15 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
- साध्वी बलात्कार प्रकरणी 25 ऑगस्टला राम रहीमला दोषी ठरवण्यात आलं होतं. राम रहीमवर बलात्कार (कलम 376), धमकावणे (कलम 506) आणि कलम 511 अन्वये शिक्षा सुनावण्यात आली.
- 2002 मध्ये साध्वींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप बाबा गुरमीत राम रहीमवर आहेत.
- साध्वीने एप्रिल 2002 मध्ये तत्कालिन मीडिया, पंजाब-हरियाणा हायकोर्टाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र लिहून राम रहीमवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.
- यानंतर हायकोर्टाने 24 सप्टेंबर 2002 रोजी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.
- 15 वर्षानंतर सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने गुरमीत राम रहीमला दोषी ठरवले.  
बातम्या आणखी आहेत...