आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9वीत असताना ऐश्वर्याने सुरु केली होती मॉडलिंग, B'Day निमित्त पाहा Rare Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऐश्वर्या रॉय 44 वर्षांची झाली आहे. 1 नोव्हेंबर 1973 ला मंगलोरमध्ये जन्मलेल्या ऐश्वर्याचे बालपणी आर्किटेक्ट होण्याचे स्वप्न होते. मात्र वाढत्या वयासोबत तिचा ओढा मॉडलिंगकडे वाढत गेला. ऐश्वर्याला मॉडलिंगची पहिली ऑफर कॅमलिन कंपनीकडून मिळाले होते, तेव्हा ती 9वीत होती. त्यानंतर तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आणि शिक्षणही सुरु ठेवले. 
 
1991 मध्ये जिंकली सुपर मॉडेल कॉन्टेस्ट 
- 1994 मध्ये अॅशने मिस वर्ल्डचा ताज जिंकला होता, हे सर्वांनाच माहित आहे. त्याही आधी 1991 मध्ये ऐश्वर्याने सुपरमॉडेल कॉन्टेस्ट जिंकली होती. फोर्डच्या वतीने आयोजित ही कॉन्टेस्ट जिंकल्यानंतर वोग मॅगझिनच्या अमेरिकन एडिशनमध्ये तिला जागा मिळाली होती. 
- 1993 मध्ये आमिर खानसोबतच्या पेप्सीच्या अॅडमध्ये झळकल्यानंतर  अॅश चर्चित चेहरा झाली होती. त्यानंतर 1994 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली होती. 
 
साऊथच्या फिल्ममधून केले रुपेरी पडद्यावर पदार्पण 
- ऐश्वर्याने साऊथची इरुवर (1997) मधून अॅक्टिंगला सुरुवात केली होती. हा चित्रपट मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केला होता. 
- अॅशने बॉलिवूडमध्ये और प्यार हो गया (1999) मधून डेब्यू केले होते. 
- संजय लिला भन्साळींच्या हम दिल दे चुके सनम (1999) मधून ऐश्वर्याला ओळख मिळाली. 
- ताल (1999),  देवदास (2002), धूम-2 (2006), उमराव जान (2006), गुरु (2007), सरकार राज (2008),  मोहब्बतें (2000), जोधा अकबर (2008) यासारख्या अनेक चित्रपटांतून अॅशने अभिनयातही आपण सरस असल्याचे दाखवून दिले. 
बातम्या आणखी आहेत...