आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवणारी पहिली अभिनेत्री आहे नीतू, अक्षयसोबत केले होते डेब्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे, मार्शल आर्टचा सराव करताना, उजवीकडे 'गरम मसाला'च्या एका सीनमध्ये अक्षय कुमारसोबत नीतू चंद्रा)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल आणि मार्शल आर्टिस्ट नीतू चंद्रा 31 वर्षांची झाली आहे. 20 जून 1984 रोजी बिहारच्या पटना शहरात जन्मलेल्या नीतूने नोट्रे डेम अॅकाडमीमध्ये शिक्षण घतेल. मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणारी नीतू आपले श्रेय आईला देते. एका लीडिंग मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले होते, की तिच्या यशाचे 90% श्रेय तिच्या आईला जाते.
तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवणारी पहिली अभिनेत्री-
बॉलिवूड अभिनेत्री नीतू चंद्राला 2012मध्ये सेकंड रँकमध्ये ब्लॅमक बेल्ट मिळाला होता. 1996मध्ये तिने वर्ल्ड तायक्वांदो चॅम्पिअनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 1997मध्ये ब्लॅक बेल्ड होल्डर झाली. 2012मध्ये तिला सेकंड डिग्रीचा ब्लॅक बेल्ट ग्रँडमास्टर जिमी आर जगतियानी यांनी दिले होते. नीतू चंद्रा भारताची पहिली अभिनेत्री आहे, जिने ब्लॅक बेल्ट मिळवला आहे.
'गरम मसाला'मधून सुरु केला अभिनय-
2005मध्ये दिग्दर्शक प्रियदर्शनच्या 'गरम मसाला' सिनेमातून नीतूने अभिनय करिअरची सुरुवात केली. या सिनेमामध्ये ती एक एअरहॉस्टेस (स्वीटी)च्या पात्रात दिसली होती. सिनेमात अक्षय कुमार, जॉन अब्राहम आणि परेश रावलसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत तिने काम केले. 2006मध्ये तिने तेलगु सिनेमा 'गोदावरी'मध्ये मुख्य भूमिका साकारली. बॉलिवूडमध्ये ती आतापर्यंत 'ट्रॅफिक सिग्नल' (2007), 'वन टू थ्री' (2008), '13B' (2009), 'रण' (2010), 'अपार्टमेंट' (2010) आणि 'नो प्रॉब्लम' (2010)सारख्या सिनेमांत झळकली आहे. हिंदी, तामिळ आणि तेलगुशिवाय तिने 2013मध्ये 'देसवा' हा भोजपूरी सिनेमा निर्मित केला होता, तिच्याच भावाने सिनेमा दिग्दर्शित केला होता.
रणदीप हुड्डासोबत होते अफेअर-
एकेकाळी नीतू चंद्रा आणि रणदीप हुड्डा यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. परंतु 2012मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. दोघांचे प्रेम इतके वाढले होते, की त्यांच्या कुटुंबीयांनी एकमेकांची भेटसुध्दा घेतली होती. दोघे लग्नगाठीत अडकणार असेही बोलले जात होते. मात्र दोघे अचानक वेगळे, याचे कारण अद्याप समोर आले नाही. परंतु असे सांगितले जाते, की रणदीपच्या धूम्रपानाच्या सवयीने नीतू हैराण झाली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नीतू चंद्राचे निवडक फोटो...