आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INTERVIEW : 'मुन्नी'ला कसा मिळाला 'बजरंगी भाईजान', जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः गेल्या आठवड्यात सलमानचा खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा रिलीज झाला. सिनेमात सलमान आणि करीना कपूर असूनदेखील भाव खाऊन गेली ती यातील चिमुरडी हर्षाली मल्होत्रा. तोंडी एकही संवाद नाही, मात्र तरीदेखील आपल्या अभिनयाने हर्षालीने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. Divyamarathi.com ला दिलेल्या एक्सक्लूझिव्ह मुलाखतीत हर्षाली आणि तिची आई काजल मल्होत्रा यांनी तिच्या सिनेकरिअर आणि भविष्यातील योजनांविषयी सांगितले. जाणून घेऊया काय म्हणाल्या या मायलेकी...
>>'बजरंगी भाईजान' हा सिनेमा कसा मिळाला?
काजल मल्होत्रा : कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबडा यांच्यासोबत माझा परिचय होता. एकेदिवशी मी त्यांना भेटायला गेले. तेथे हर्षालीसोबत त्यांची भेट घालून दिली. काही महिन्यांनंतर त्यांच्या ऑफिसमधून मला बोलावणे आले. हर्षालीची बॉडी लँग्वेज त्यांना तपासून बघायची होती. मी सरप्राईज्ड होते आणि एक्साइटेडसुद्धा. कारण ही सर्व प्रोसेस सलमान खान स्टारर सिनेमासाठी केली जात होती. काही दिवसांनी मला पुन्हा फोन आला. यावेळी सलमानला हर्षालीसोबत भेटायचे होते. या मुलाखतीत हर्षालीने सलमानला म्हटले, की तिलासुद्धा त्याच्यासारखे मोठे स्टार व्हायचे आहे. या भेटीनंतर हर्षालीला शाहिदाच्या भूमिकेसाठी फायनल करण्यात आले. सर्वांना तिचा अभिनय पसंत पडला, याचा मला आनंद आहे.
>>हर्षाली लाइमलाइटमध्ये कशी आली?
काजल मल्होत्रा : आम्ही एकदा मॉलमध्ये शॉपिंगसाठी गेलो होतो. येथे मुलांचे फोटोशूट सुरु होते. तेथे हर्षालीनेसुद्धा अनेक पोज दिल्या. यासाठी तिला तिथे अवॉर्डदेखील मिळाला होता. त्या फोटोशूटनंतर तिला जाहिराती आणि टीव्ही शोजच्या ऑफर यायला सुरुवात झाली. गेल्या दोन वर्षांत हर्षाली अनेक जाहिराती आणि 'सावधान इंडिया', 'लौट आओ तृषा' या मालिकांमध्ये झळकली आहे.
पुढे वाचा, उर्वरित मुलाखत...