आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हेट स्टोरी 3'मध्ये दिसणार सलमानसोबत डेब्यू केलेल्या अभिनेत्रींचा बोल्डनेस, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डेजी शाह (वरती), खाली करण सिंह ग्रोव्हर आणि झरीन खान)
मुंबई- 'हेट स्टोरी 3' या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा सिनेमा 2012मध्ये आलेल्या 'हेट स्टोरी' या सिनेमाचा तिसरा पार्ट आहे. याचा दुसरा पार्ट जुलैमध्ये रिलीज झाला होता. पहिल्या दोन पार्ट्सच्या तुलनेत तिसरा पार्ट सेक्स आणि बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडताना दिसणार आहे. यावेळी सिनेमात एक नव्हे दोन अभिनेत्री आहेत आणि दोन्ही अभिनेत्रींनी सुपरस्टार सलमान खानसोबत पदार्पण केले आहे.
'वीर' फेम झरीन खान आणि कतरिना कैफची हमशक्ल म्हणून ओळखली जाणारी 'जय हो' फेम डेजी शाह सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. ट्रेलरवरून स्पष्ट दिसते, की सिनेमात दोन्ही अभिनेत्रींनी बोल्ड सीन्स दिले आहेत. सिनेमाचा मुख्य अभिनेता शरमन जोशी आहे. करण सिंह ग्रोव्हरसुध्दा सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. विशाल पांड्या दिग्दर्शित हा सिनेमा 2 डिसेंबरला रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाच्या ट्रेलरमधून घेतलेले शरमन, झरीन, करण आणि डेजीचे काही फोटो... शेवटच्या स्लाइडवर पाहा सिनेमाचा ट्रेलर...