Home »News» Hate Story Actress Shocking Comment On The Molestation Of Other Actresses

'हेट स्टोरी'ची हीरोइन म्हणाली - 'पहिले पुरुषांसोबत करतात शय्यासोबत, मग म्हणतात लैंगिक शोषण झाले'

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 11:07 AM IST

मुंबईः 'हेट स्टोरी' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री भैरवी गोस्वामी हिने बॉलिवूड अभिनेत्रींविषयी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. तिचे हे वक्तव्य सेक्शुअल हरॅसमेंटशी संबधित आहे. बुधवारी एक ट्वीट करुन भैरवीने लिहिले, "अभिनेत्री चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी आणि प्रसिद्ध होण्यासाठी आधी पुरुषांसोबत शय्यासोबत करतात आणि नंतर 10 वर्षांनी माझे लैंगिक शोषण झाले, असा गौप्यस्फोट करण्याचा प्रयत्न करतात." खरं तर भैरवीने हे ट्वीट कुणाला उद्देशून केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

32 वर्षीय भैरवीने केलंय या चित्रपटांमध्ये काम...
- भैरवी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने हिंदीतसुद्धा बरेच सिनेमे केले आहेत. 'मिस्टर भट्टी ऑन छुट्टी', कच्चा लिंबू', 'माय फ्रेंड गणेशा 2', 'भेजा फ्राई' आणि 'कामसूत्र - द पोएट्री ऑफ सेक्स' या चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.
- काही दिवसांपूर्वी कृती सेननविरोधात वक्तव्य करुन भैरवी चर्चेत आली होती. कृतीने अर्जुन कपूर स्टारर 'मुबारकां' या चित्रपटातील 'हवा हवा' या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओवर कमेंट करताना भैरवी म्हणाली होती, "कृती अतिशय विक्षिप्त महिलेसारखे वागतेय. ती अभिनेत्री बनली कशी? हेडलाइटही नाही आणि बंपरही नाही.. कॉलेज स्टूडंट्स हिच्यापेक्षा छान दिसतात."
पुढील स्लाईड्सवर बघा, भैरवीचे 3 फोटोज...

Next Article

Recommended