आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Have A Look At He Adorable Birthday Wish Made By Imara To Daddy Imran Khan

B\'dayला दीड वर्षांच्या लेकीने दिले खास गिफ्ट, इमरानने शेअर केला PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इमरान खान, इमारा खान - Divya Marathi
इमरान खान, इमारा खान
मुंबई- बुधवारी (12 जानेवारी) इमरान खानने 34वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्तावर त्याला दीड वर्षांची मुलगी इमाराकडून विशेष शुभेच्छा मिळाल्या. इमाराचे 'हॅपी बर्थडे-पापा, आय लव्ह यू' लिहिलेला मॅसेज इमरानने सोशल साइटवर शेअर केला.
इमरान म्हणाला, 13 वर्षे जूने आहे पत्नी अवंतिकासोबतचे नाते...
बर्थडेदरम्याव इमरानने आपल्या फॅमिलीविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. 10 जानेवारी लग्नाचा वाढदिवस साजरा केलेल्या इमरानने सांगितले, की अवंतिकासोबत माझे 13 वर्षे जूने नाते आहे. त्यामुळेच दोघे एकमेकांना चांगले ओळखतात.
भांडण सोडवण्याची प्रत्येक कपलची अनोखी पध्दत असते...
इमरानने सांगितले, 'लग्नापूर्वी आम्ही एकमेकांना डेट करत होतो. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचे नाते मी प्रामाणिकपणे निभावले. त्यादरम्यान आमच्या नात्यात बरेच उतार-चढाव आले आणि चांगल्या नात्यासाठी रुसणे, समजावणे गरजेचे असते. प्रत्येक कपलसाठी हे उपाय वेगळे असतात. दुस-यांच्या ट्रिक आपल्या नात्यात आमलात आणू नये. अवंतिकासोबत नाते जुळल्यानंतर मी नात्यांविषयी खूप काही शिकलो. पहिले फ्रेंड, गर्लफ्रेंड आणि नंतर पत्नी. तीन स्टेजवर अवंतिकासोबतचे नाते मजबूत झाले आहे. ती आजसुध्दा माझी बेस्टफ्रेंड आहे.'
मुलगी आयुष्यात आल्यानंतर आली समजूतदारपणा...
अवंतिकाच्या प्रेग्नेंसीदरम्यान इमरान नेहमी सोबत होता. त्यादरम्यान कोणताच सिनेमा साइन केला नाही. मुलीविषयी तो सांगतो, 'इमारा आमच्या आयुष्यात आल्यापासून माझ्या एक समजूतदारपणा आला आहे. वडील होण्याची जाणीव आहे, नेहमी मुलीची चिंता असते. तिच्यासोबत राहिल्यानंतर मी सर्वकाही विसरतो. कोणतेच टेन्शन किंवा कामाचा तणाव घेत नाही. माझ्या आयुष्यातील सर्वात अनमोल भेट आहे इमारा. ती मला तणावमुक्त करते.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इमरान-अवंतिका आणि इमाराचे फोटो...