आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hazel Keech Yuvraj Singh Confirmed Their Marriage

हेजलने दिले लग्नाचे स्पष्टीकरण, युवराजसोबतचा Engagement Photo केला शेअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेजल किच, युवराज सिंह
मुंबई- क्रिकेटर युवराज सिंहसोबत साखरपुडा केल्यानंतर अभिनेत्री हेजल किचने सोशल साइट्सवर लग्नाविषयी स्पष्टीकरण दिले आहे. इंस्टाग्रामवर हेजलने एक फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये ती युवराजसोबत दिसत आहे. सोबतच ती आपल्या साखरपुड्याच्या अंगठी दाखवताना दिसत आहे. फोटो पोस्ट करून तिने लिहिले, 'Yes, its true, im getting married to @groovi12 Im so thankful to have found such an amazing person #shazam'
दुसरीकडे युवराज सिंहनेसुध्दा आपल्या साखरपुड्याविषयी टि्वटरवर चाहत्यांना सांगितले आहे. त्याने टि्वट करून लिहिले, 'Yes I am engaged cause i found a friend for life in @hazelkeech as mom says a reflection of her ❤'
दिवाळीच्या दिवशी इंडोनेशियाच्या बालीमध्ये दोघांनी साखरपुडा केला. त्यांच्या साखरपुड्याचा फोटो सोशल साइट्सवर खूप व्हायरल होत आहे.
केव्हा होणार हेजल-युवराजचे लग्न?
येणा-या वर्षात युवराज आणि हेजलचे लग्‍न होणार आहे. बालीमध्‍ये त्‍यांचा साखरपुडा झाला. फतेहगडममधील हंसालीवाला गुरुद्वारामध्‍ये त्‍यांचे लग्‍न होणार आहे. दरम्‍यान, चंदीगडमध्‍ये ते पार्टीसुद्धा देणार आहेत. युवराजच्‍या 34 व्‍या वाढदिवसाच्‍या दुस-या दिवशी म्‍हणजेच 13 डिसेंबरला हे लग्‍न होणार होते. पण, एका नातेवाईकाच्‍या मृत्‍यूनंतर तारीख पुढे ढकलण्‍यात आली.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा युवराजचे टि्वट... आणि युवराज-हेजलचे नुकतेच क्लिक झालेले फोटो...