आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'He Should Be Hanged\': Pratyusha Banerjee\'s Father Blames Her Boyfriend

प्रत्यूषा आत्महत्या: राहुलला होणार अटक, कोर्टाने अटकपूर्व जामिन फेटाळला!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- प्रत्यूषा बनर्जी सुसाईड केसप्रकरणी तिचा प्रियकर राहुल राज सिंह याच्या संकटात वाढ होताना दिसत आहे. राहुल राज याने मुंबईतील दिंडोशी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्याला जामिन नाकारला आहे. पोलिसांनी मंगळवारी राहुल राज याच्याविरोधात प्रत्यूषाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमध्ये मारहाण आणि शिवीगाळ करणे आदीचा उल्लेख आहे. दरम्यान, यामुळे राहुल राज याला अटक होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. राहुल राज याचा वकिल नीरज गुप्ता यानेही ही केस सोडून दिली आहे.
प्रत्यूषाचे वडिल म्हणाले, राहुलला फासावर चढवा-
- मागील आठवड्यात आत्महत्या केलेल्या प्रत्यूषाच्या पालकांनी राहुल राज याच्यावर प्रथमच आरोप केले आहेत. आपल्या मुलीची त्याने फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला.
- मुंबईतील एका पत्रकार परिषदेत वडिल शंकर बनर्जी म्हणाले, राहुल माझ्या मुलीचा गुन्हेगार आहे. एक तर त्याला फाशी झाली पाहिजे किंवा जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे.
- राहुलचे अनेक तरूणीसोबत संबंध होते. प्रत्यूषा त्याच्या जाळ्यात फसली. राहुल त्याची पूर्वीची प्रेयसी सलोनीसोबत तिला मारहाण करायचा.
- त्यांनी सांगितले की, प्रत्यूषा खूपच कणखर व जिंदादिल मुलगी होती. ती सुसाईड करू शकत नाही.
- प्रत्यूषाची आई सोमा बनर्जी यांनी सांगितले की, राहुल प्रत्यूषाला खूपच टॉर्चर करीत असे.
राहुलला होणार अटक? सर्व मित्रांचीही चौकशी करणार-
- पोलिस प्रत्यूषाच्या आईच्या तक्रारीनंतर राहुल राज सिंहवर आत्महत्येचा प्रवृत्त करणे, टॉर्चर करणे तथा धमकी देणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
- राहुल सध्या आयसीयूमध्ये अॅडमिट आहे. प्रत्यूषाच्या आत्महत्येनंतर लो ब्लड प्रेशर आणि चेस्ट पेन होत असल्याने त्याला रूग्णालयात दाखल केले आहे.
- पोलिस राहुलच्या डिस्चार्जची वाट पाहत आहेत. त्यानंतर तपासाला गती येईल असा पोलिसांचा दावा आहे.
- दुसरीकडे, या प्रकरणी काही महत्त्वाचे पुरावे असल्याचा दावा करणारी प्रत्यूषाची मैत्रिण काम्या पंजाबी, विकास गुप्ता आणि तिच्या वकिलाचा जबाब पोलिस नोंदवून घेणार आहे.