आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hema Malini\'s Driver Arrested After Accident In Which A Child Was Killed

जाणून घ्या, कोणत्या परिस्थितीत आहेत हेमा मालिनीच्या ड्रायव्हरचे कुटुंब?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः डावीकडे (वर) पोलिसांच्या ताब्यात ड्रायव्हर महेश ठाकूर, (खाली) ड्रायव्हर महेश ठाकूरचे कुटुंबीय, उजवीकडे (वर) अपघातानंतर जखमी झालेल्या हेमामालिनी, (खाली) अपघातात मृत्यूमुखी पडलेली दीड वर्षांची चिमुरडी)
बॉलिवूडची ड्रीमगर्ल आणि खासदार हेमा मालिनी राजस्थानच्या दौसा येथे घडलेल्या कार अपघातात जखमी झाल्या आहेत. जयपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार झाल्यानंतर त्या आता मुंबईत परतल्या आहेत. हेमामालिनी यांच्या कारच्या ड्रायव्हरने ओव्हरस्पीडने गाडी चालवल्याने हा अपघात घडल्याचे म्हटले जात आहे. या अपघातात एका दीड वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ड्रायव्हर महेशचंद्र ठाकूरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी त्याची जामिनावर सुटकाही झाली.
हेमा मालिनी ज्या मर्सिडीज कारने जयपूरकडे जात होत्या, त्याचा ड्रायव्हरच्या कुटुंबाकडे लक्ष देणारा कुणीही नाहीये. गुरुवारी अपघात घडल्यानंतर ड्रायव्हर महेशचंद्र ठाकूरच्या कुटुंबाला शुक्रवारी सकाळी या घटनेची माहिती मिळाली. ते वृंदावनच्या समीपवर्ती गावांतील कीकी येथे वास्तव्याला आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच महेशचंद्रचे धाकटे भाऊ दिनेश आणि नरेश जयपूरला रवाना झाले आहेत.
महेशचे वडील राम सिंह यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, महेशला लहान चार मुले आहेत. आम्ही खूप गरीब आहोत. संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी महेशवरच आहे. तीन वर्षांपासून तो कन्हाई कुटुंबाची गाडी चालवून कुटुंबाचे पालनपोषण करतोय.
महेशच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास महेश यांनी घरी येऊन दोन-तीन दिवसांसाठी बाहेर जात असल्याचे सांगितले. त्याचा आठ महिन्यांचा मुलगा कुलदीप गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, या घटनेशी निगडीत छायाचित्रे...