आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hepatitis B Came Accidentally To Me Amitabh Bachchan

‘हिपॅटायटिस बी’ने माझे ७५% यकृत खराब, ‘कुली’च्या वेळेस झाली बाधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘हिपॅटायटिस- बी’ आजाराने आपले यकृत ७५ टक्के खराब झाल्याचे बाॅलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘हिपॅटायटिस-बी’विरोधी माेहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून बच्चन यांची निवड केली. त्याच्या शुभारंभानिमित्त कार्यक्रमात ते बाेलत हाेते. या आजाराची माहिती देण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व युनिसेफकडून ‘कन्फेशन्स फ्रॉम एबी’ चित्रपट बनवला जात आहे. त्यात ‘हिपॅटायटिस-बी’सह घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, क्षय व गोवर आजारांची माहिती आहे.

जनजागृती मोहिमेस प्रारंभ : ‘हिपॅटायटिस-बी’ हा व्हायरल इन्फेक्शनमुळे पसरणारा आजार असून जगभरात दरवर्षी ७ लाख ८० हजार रुग्णांचा या आजाराने मृत्यू होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीवरून उघड झाले आहे. भारतात या आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सरकारतर्फे विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
‘कुली’ अपघाताने अाजार
३३ वर्षांपूर्वी "कुली'च्या शूटिंगदरम्यान मला अपघात झाला. नंतर रक्त चढवण्यात आले. अनेकांनी माझ्यासाठी रक्तदान केले. मात्र, एका बाटलीतील रक्त ‘हिपॅटायटिस- बी’ने संक्रमित होते. सन २००० मध्ये ‘हिपॅटायटिस’ने ७५% यकृत खराब झाल्याचे स्पष्ट झाले. २० वर्षांपासून त्याच्याशी झुंजतोय, त्यामुळे त्याची घातकता माहिती आहे, असे बिग बी म्हणाले.
असा होताेे संसर्ग
दूषित पाणी वा अन्नातून ‘हिपॅटायटिस-बी’ या व्हायरसचा शरीरात प्रवेश झाल्याने हा आजार होतो. वेळेवर उपचार न झाल्यास यकृताचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. भारतात वर्षभरात दहा लाख मुलांना दीर्घकालीन यकृताच्या आजाराची लागण होते. या आजारावर वेळीच उपचार न केल्यास अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागते.
६५ टक्केेच लसीकरण : बाळ एका वर्षाचे असताना त्याला ‘हिपॅटायटिस-बी’ ची लस दिली जाते. मात्र भारतात फक्त ६५ टक्के बालकांचेच लसीकरण होते. सध्या भारतात २७ लाख लहान मुले आणि ३० लाख गर्भवती महिलांचे लसीकरण करून दरवर्षी तीन लाख लोकांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. मात्र, तरीही रुग्णांची संख्या वाढत आहे.