आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Poster out: ऐश्वर्या स्टारर 'जज्बा'मधील इरफानचा लूक रिलीज, दिसला रफ अँड टफ अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('जज्बा'च्या फस्ट लूकमध्ये इरफान खान)
मुंबईः ऐश्वर्या राय बच्चनचा कमबॅक सिनेमा असलेल्या 'जज्बा'ची सुरुवातीपासूनच बरीच चर्चा होत आहे. ऐश्वर्याने अलीकडेच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या सिनेमाचा फस्ट लूक रिलीज केला. आता सिनेमात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता इरफान खानचा लूकसुद्धा रिलीज करण्यात आला आहे.
दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी आपल्या ट्विटर पेजवर इरफानच्या फस्ट लूकचे पोस्टर रिलीज केले. पोस्टरमध्ये इरफान रफ अँड टफ लूकमध्ये दिसतोय. त्याने शर्ट आणि जॅकेट परिधान केले असून डोळ्यांवर गॉगल लावला आहे. सिनेमात इरफानने सस्पेंट पोलिस ऑफिसरची भूमिका वठवली असून ऐश्वर्याने त्याच्या वकिलाची भूमिका साकारली आहे.
संजय गुप्ता आपल्या सिनेमांमध्ये अॅक्टर्सच्या मेकओव्हरसाठी प्रसिद्ध आहेत. या सिनेमात त्यांनी इरफानला नवीन अंदाजात सादर केले आहे. याची माहिती त्यांनी ट्विट करुन दिली. त्यांनी ट्विट केले, "I've always enjoyed doing a complete makeover with all my heroes. Amitji, Sanju, Anil, Jackie, Ajay, Saif, Sunil, John and now Irrfan."
यावर्षी 9 ऑक्टोबर रिलीज होणारा हा अॅक्शन थ्रिलर सिनेमा 'सेव्हन डेज' या साउथ कोरिअन सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. सिनेमात ऐश्वर्या आणि इरफानसह अनुपम खेर, शबाना आझमी, जॅकी श्रॉफ, अतुल कुलकर्णी, अभिमन्यू सिंह, चंदन रॉय सान्याल आणि सिद्धार्थ कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'जज्बा'मधील ऐश्वर्याचा लूक....