आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'केदारनाथ' मंदिरात पोहोचले सारा-सुशांत, लवकरच सुरू होणार चित्रपटाचे शुटिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केदारनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सारा आणि सुशांत. - Divya Marathi
केदारनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सारा आणि सुशांत.
मुंबई - सगळ्यांच्या नजरा सध्या सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत यांचा अपकमिंग चित्रपट 'केदारनाथ'कडे लागलेल्या आहेत. या चित्रपटाचे पहिले शेड्युल 3 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी संपूर्ण कास्ट सध्या देहरादूनला पोहोचली आहे. चित्रपटाचे शुटिंग सुरू व्हायला मोजकेच दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे चित्रपटातील लीक अॅक्टर्स सारा आणि सुशांतने 'केदारनाथ' मंदिरात जाऊन शंकराचे दर्शन घेतले, यावेळी त्यांच्याबरोबर डायरेक्टर अभिषेक कपूर आणि इतर टीमही होती. 

सारा अली खानचा हा डेब्यू चित्रपट असून, या चित्रपटात साराचा डिग्लॅम लूक पाहायला मिळणार आहे. चित्रपटात सारा एका रिच टुरिस्टची भूमिका करत आहे. तर सुशांत पिट्ठूची भूमिका करणार आहे. चित्रपटाचे डायरेक्टर अभिषेक कपूर आहेत. एकता कपूर याची को प्रोड्युसर आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, केदारनाथला पोहोचलेल्या सारा, सुशांत आणि इतर टीमचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...