आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा वाढतेय रणबीर-दीपिकाची जवळीक? मुलाखतीत दिले असे स्पष्टीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर - Divya Marathi
दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर
मुंबई: काही तासांसाठी मुंबईला आलेल्या दीपिका पदुकोणने रणबीरविषयी प्रेम आणि काळजी असल्याची पुष्टी दिली. सिनेसृष्टीत काही दिवसांपासून चर्चा होती, की दीपिका जूने प्रेम अर्थातच रणबीरकडे परत येण्याचा विचार करतेय. तिच्या या भेटीनंतर दोघांची मैत्री वाढत जात असल्याचे दिसत आहे. एका मुलाखतीत तिने स्पष्ट केले, की कुणी रणबीरविषयी वाईट बोलले तर तिला आवडत नाही.
दीपिका म्हणाली, 'हो रणबीरविषयी पझेसिव्ह आहे'...
- रणबीरविषयी प्रोटेक्टिव्ह असल्याच्या प्रश्नावर दीपिकाने सांगितले, 'हो रणबीरविषयी मी प्रोटेक्टिव्ह आणि पझेसिव्हसुध्दा आहे. मला वाईट वाटते, जेव्हा रणबीरविषयी कुणी वाईट बोलले तर.'
- आमच्यात चांगली मैत्री आणि बाँडिंग आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो. कधीच बदलणार नाही. रणबीरमध्ये पूर्वीपेक्षा खूप मॅच्योरिटी आली आहे.
- आयुष्याविषयी वेगळी समज आहे आणि मला याचा आनंद आहे. आम्ही नेहमी म्हणतो, की भूतकाळातील नात्याविषयी चर्चा करण्यापेक्षा कामावर चर्चा केलेली योग्य.
प्रेम संपले नाही: रणबीर कपूर
- हाच प्रश्न रणबीरला विचारल्यानंतर तो सांगतो, 'आमच्या दुरावा आला असला तरी प्रेम संपले नाहीये.'
- प्रेमाचे अनेक स्तर असतात. सर्व स्तर कसे संपू शकतात. मी आजसुध्दा दीपिकाची काळजी घेतो. तिच्या कामाचा मला अभिमान वाटतो.
- आम्ही एखादा सिनेमा एकत्र करत असतो, तेव्हा त्यातील प्रत्येक छोट्या-मोठ्या सीनविषयी चर्चा करतो.
- आम्ही दोघे आपआपल्या आयुष्याविषयी सकारात्मक आहोत. पुढे जातोय. वेळ आणि वयासोबतच आम्ही पूर्वीपेक्षा मॅच्योर झालो आहोत.
मागील वर्षी दीपिकाने केली होती रणबीरची प्रशंसा...
- मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये 'तमाशा' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान दोघे सोबत-सोबत दिसत होते.
- दोघांनी सोबत एक इंटरव्ह्यूसुध्दा केला होता. रणबीरच्या मागील अपयशाशी निगडीत प्रश्नांमुळे दीपिका नाराज झाली होती.
- दीपिका म्हणाली होती, 'करिअरमध्ये उतार-चढाव आणि फ्लॉप सिनेमे प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात आहे आहेत. रणबीरला सतत पिंज-यात का उभे केले जाते'\\
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रणबीर-दीपिकाचे सोबतची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...