आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हीरो'च्या FIRST LOOK मध्ये दिसतेय सूरज आणि अथियाची सिझलिंग केमिस्ट्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सूरज पांचोली आणि अथिया शेट्टी)
मुंबईः अभिनेता सलमान खानच्या प्रॉडक्शनच्या 'हीरो' या सिनेमाद्वारे सूरज पांचोली आणि अथिया शेट्टी हे नवोदित सिनेसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत. या दोघांच्या सिझलिंग केमिस्ट्री असलेले एक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
अथिया ही अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी असून सोमवारी तिचा सिनेमातील फस्ट लूक रिलीज करण्यात आला होता. पोस्टरमध्ये अथिया फनी मूडमध्ये दिसत होती. तर सिनेमात लीड अॅक्टर असेलला आदित्य पांचोलीचा मुलगा सूरजचा फस्ट लूक ब-याच दिवसांपूर्वी समोर आला आहे. 15 जुलैला सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे.
'हीरो' हा 1983 मध्ये याच नावाने आलेल्या सुभाष घई यांच्या सिनेमाचा रिमेक आहे. तर हा सिनेमा निखिल आडवणी यांनी दिग्दर्शित केला आहे. सलमान खान या सिनेमाचा निर्माता आहे. सिनेमात गोविंदा, विनोद खन्ना आणि अनिता हसनंदानी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यावर्षी 11 सप्टेंबरला सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सिनेमातील अथिया आणि सूरज यांचा लूक...