आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हमशकल्स'च्या दिग्दर्शकाची टि्वटरवर एंट्री, चाहत्यांनी अशी उडवली खिल्ली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(साजिद खानचे टि्वटर प्रोफाइल फोटो, सोबत चाहत्यांचे खिल्ली उडवणारे टि्वट)
मुंबई- 'हिम्मतवाला' आणि 'हमशकल्स'सारख्या सिनेमांमुळे चाहत्यांच्या निशाण्यावर राहणारा दिग्दर्शक साजिद खानला पुन्हा एकदा चाहत्यांनी टार्गेट केले आहे. यावेळी तो सिनेमामुळे नव्हे मायक्रोब्लॉगिंग साइट टि्वटर ज्वॉइन केल्याने तो चाहत्यांच्या निशाणीवर आला आहे. त्यांनी 16 एप्रिल रोजी टि्वटर ज्वॉइन केले आहे. एकिकडे अक्षय कुमार, फराह खानसारख्या सेलेब्सने चाहत्यांना साजिदच्या वार्मवेलकमची अपील केली आहे, परंतु दुसरीकडे चाहत्यांची त्यांची जोरदार खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे.
कुणी म्हणतय, की साजिद खान आल्यानंतर आता टि्वटरसुध्दा सुरक्षित नाहीये तर कुणी त्याच्या दिग्दर्शनावर खिल्ली उडवत आहे. श्रीधर नावाच्या एका चाहत्याने टि्वट केले, 'Sajid Khan doesn't like apartments. Coz, he doesn't believe in the concept of Storeys.' (साजिद खानला अपार्टमेंट आवडत नाही, कारण त्याला स्टोरीच्या कन्सेप्टवर विश्वास नाहीये)
हे केवळ एक उदाहरण आहे, असेच अनेक विनोदी टि्वट्स चाहत्यांनी साजिदविषयी केले आहेत, चला एक नजर टाकूया अशाच टि्वटवर...