2002च्या हिट अँड रन या प्रकरणातील 5 वर्षांच्या शिक्षेच्या विरोधात बॉम्बे हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर 30 जुलै रोजी सुनावणी आहे. या वर्षी मे महिन्यात मुंबईच्या सत्र न्यायालयाने सलमानला या प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र ज्या दिवशी शिक्षा सुनावली दिवशी त्याच्या शिक्षेवर हायकोर्टातून स्थगिती देण्यात आली होती. सलमानने सत्रन्यायालयाकडून मिळालेल्या शिक्षेला बॉम्बे हायकोर्टात आव्हान दिले होते.
सत्रन्यायालयाने फेटाळून लावली होती जमीनाची विरोधाची याचिका-
हिट अँड रन प्रकरणात दुसरे अपडेट असे, की सलमानचा जामीन रद्द करण्याची याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र सत्रन्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. ही याचिका प्रकरणाशी निगडीत एका हवालदाराच्या आईने दाखल केली होती, त्यांचे ट्रान्सफर मुंबईहून दिल्लीला करण्यात आले होते. या हवालदाराचे निधन झाले आहे.
काय आहे हिट अँड रन प्रकरण-
28 सप्टेंबर 2002 रोजी वांद्रामध्ये बेकरीच्या बाहेर सलमान खानच्या कारने चिरडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि त्यातील चार जण गंभीर जखमी झाले होते. प्रकरणात सलमानवर मनुष्यवधाचा आरोप लावण्यात आला होता.